सोलापूर - हवामान कार्यालयाच्या मागील बाजूस साठवलेल्या कचर्याला सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या वेळी कचरा गोळा करणार्या वाहनालाही आग लागली. या आगीमुळे वाहनाचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने दोन बंब वापरून आग विझवली. शहरात अनेक ठिकाणी कचरा साठवला जात आहे. ‘दिव्य मराठी’ने शासकीय तंत्रनिकेतन शेजारील हवामान कार्यालयाच्या पिछाडीस कचरा साठवला जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेने गांभीर्याने त्याकडे लक्ष दिले नाही. सोमवारी रात्री कचर्याला आग लागली. आगीत शेजारी असलेले वाहन जळाले.
दोषीवर कारवाई करू
घंटागाडीतून मोठ्या वाहनात कचरा टाकण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. हवामान खात्याच्या मागे कचरा का साठवण्यात आला आणि तेथे कचरा गोळा करणारे वाहन का ठेवले. याबाबत उद्या माहिती घेऊ. दोषीवर कारवाई करू. डी.एस. पुजारी, प्रभारी मुख्य सफाई अधीक्षक