आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरसाठी दर रविवारी धावणार गरीब रथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे प्रशासनाने यशवंतपूर(बंगळुरू) ते जयपूर साप्ताहिक विशेष गरीब रथ गाडी सुरू केली आहे. ही गाडी (060511) दर रविवारी यशवंतपूर स्थानकावरून पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी जयपूरसाठी निघेल. विजापूरमार्गे ती सोलापूरला रात्री 12 वाजून 05 मिनिटांनी येईल. येथे 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी कुडरुवाडी मार्गे पुण्याला 4 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. तर जयपूरला गाडी मंगळवारी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. दर मंगळवारी जयपूरहून ही गाडी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी यशवंतपूरसाठी रवाना होईल. दुसर्‍या दिवशी पुण्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी गाडी पोहोचेल. तेथे 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी सोलापूरक डे मार्गस्थ होईल. सोलापूरला ही गाडी सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी यशवंतपूरकडे रवाना होईल. तेथे दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.

गाडी 7 जुलै ते 30 जुलै दरम्यान धावणार आहे. याला 18 कोच जोडण्यात आलेले आहे. प्रवाशांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.