आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 % गॅसधारकांकडे नाही बँक खाते, आधार, बँक खाते उघडण्यासाठीही धावाधाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- घरगुतीगॅसचे अनुदान बँकांच्या खात्यावर जमा होणार आहे. याची अंमलबजावणी येत्या जानेवारीपासून होत आहे. मात्र, सुमारे 40 टक्के ग्राहकांकडे बँक खाती नसल्याची माहिती शहरातील गॅस वितरकांनी दिली.
यूपीए सरकार कालावधीतील आधार क्रमांकाशी निगडित गॅस अनुदान योजना लागू करणार आहे. मात्र यासाठी पहिले तीने महिने ग्राहकांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे. त्यानंतर मात्र, आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. जूनपर्यंत आधारक्रमांकाशी बँक खाते जोडल्यास मागील अनुदान मिळणार असल्याची माहिती गॅस कंपनी अधिका-यांकडून देण्यात आली. ग्राहकांना अनुदानित विनाअनुदानित गॅस योजनेची माहिती देण्यासाठी लवकरच सूचना देण्यात येणार असल्याचे कंपनी अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.
आज सोलापूर शहर-जिल्ह्यात सात लाखांपेक्षा अधिक घरगुती गॅसचा वापर करणारे ग्राहक आहेत. यामध्ये भारत गॅसचा वापर करणारे लाख 60 हजार ग्राहक आहेत. केंद्र सरकारकडून यापूर्वी दोन वेळा बैठक झाली. मात्र याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याने सुरुवातीचे जानेवारी ते ३१ मार्च हे तीन महिने बँक खाते ग्राह्य धरून अनुदान जमा करणार आहे. त्यानंतर जूनपर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची ग्राहकांना मुदत दिली जाणार आहे. मात्र याबाबत शहर-जिल्ह्यातील एकाही एजन्सीला अधिकृत पत्र मिळाले नाही.
शहर-जिल्ह्यात भारत गॅसचे लाख 60 हजार तर हिंदुस्थान पेट्रोलियमचे सव्वा लाख ग्राहक आहेत. यामध्ये सरासरी 30 टक्के ग्राहकांनी आधार बँक खाते लिंक करण्यात आले आहे तर किती ग्राहकांकडे बँक खाते आहेत, याची ताजी आकडेवारी आज गॅस कंपनीकडे नसल्याचे गॅस कंपनीकडून सांगण्यात आले. योजना जानेवारीपासून लागू करण्यात येणार असली तरी अद्याप आम्हाला शासनाकडून अधिकृत कोणतेही आदेश नाहीत. यूपीए सरकारने एका वर्षामध्ये अनुदानित गॅस सिलिंडर देणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे भाजप सरकारही हीच संख्या कायम ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करण्याविषयी शासनाकडून अधिकृत आदेश येताच त्याविषयी बोलणे इष्ट असल्याचे मत शहरातील गॅस एजन्सींनी सांगितले.