आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gate Together For Solapur Industry Development Collector

औद्योगिक विकासासाठी समूह पद्धतीने एकत्र या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्ह्याची ओळख ही औद्योगिक क्षेत्रातील जिल्हा अशी आहे. ती आता कमी होत चालली आहे, हे कशामुळे होते आहे? यासाठी काय केले पाहिजे ? याचा विचार करून एकत्रित या. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी समूह पद्धतीने एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.

मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र सल्लागार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्यात वस्त्रोद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग असे कोणकोणते उद्योग होऊ शकतात याबाबत सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन विचार करावा. तसेच औद्योगिक विकासासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. जिल्ह्यात नवीन उद्योग येत नसल्याने असे कुशल मनुष्यबळ इतर जिल्ह्यात स्थलांतर होत आहे, यामागची कारणे शोधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मुंढे यांनी केले. बैठकीस उद्योग केंद्राचे शिवाजी बनसोडे, विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. भोसले, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, लघुद्योग संघटनेचे हरिभाऊ गोडबोले, अतुल बक्षी, मनपा सहायक आयुक्त अमिता दगडे, गंगाधर दुलंगे, महावितरणचे अभियंता साळे आदी उपस्थित होते.

वसाहतीत मूलभूत सुविधांची मागणी
याबैठकीत चिंचोळी, अक्कलकोट रोड, औद्योगिक इतर औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सुविधा, उद्योजकांच्या विविध अडचणी सोडवण्याचे आदेश दिले. या वेळी उद्योजकांनी विविध मागण्या मांडल्या. यामध्ये उद्योग भवन उभारावे, औद्योगिक वसाहतीसाठी फोम गाडीची व्यवस्था करावी, वसाहतीमधील पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे विविध परवाने तत्काळ मिळण्याची मागणी केली.

१०वर्षांतील खर्चाचा मनपाने हिशेब द्यावा
जिल्हाधिकारीकार्यालयात उद्योग मित्र बैठकीत महापालिकेकडून सुविधा मिळत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली. यावर जिल्हाधिकारी मुंढे यांनी महापालिकेस औद्योगिक वसाहतीकडून किती रुपयांचा महसूल मिळाला आपण िकती रुपये औद्योगिक वसाहतीवर खर्च केले, याचा येत्या दिवसांमध्ये हिशेब देण्याचे आदेश दिले. शिवाय बैठकीस आयुक्त गुडेवार उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली.