आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घ्यावे, लक्ष्मी ग्रुपचे संचालक संजीव पाटील यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबर तांत्रिक ज्ञानाची जोड आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाधिष्ठ शिक्षणाकडे वळावे, असे आवाहन लक्ष्मी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग (मुंबई), शासकीय तंत्रनिकेतन आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीने करिअर फेअरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. या वेळी संचालक डॉ. अरविंद देशपांडे, डॉ. विजय वनकर, प्राचार्या स्वाती देशपांडे आणि डी. बी थोरात आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, “राष्ट्रपती ए. पी. जे. आब्दुल कलाम २०२० मध्ये देश महासत्ता होणार असे म्हणाले आहेत. त्यासाठी अशा तरुणांमुळेच देश बलवान होणार आहे. त्यांच्या कल्पना अाविष्कारातून समाजपयोगी तंत्रज्ञान तयार करावे. भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.”

अरविंद देशपांडे म्हणाले की, विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी व्हीजन ठेवून अभ्यास करावा . तुमची क्षमता ध्येय ओळखून करिअरकडे पाहण्याची ही वेळ आहे. अशा करिअर फोरमच्या माध्यमातून एक वेगळी दिशा मिळणार अाहे. ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही ठेवली पाहिजे.
तज्ज्ञांनीकेले मार्गदर्शन : तंत्रनिकेतनच्याविविध संधीबाबत सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य शंकर नवले यांनी मार्गदर्शन केले. करिअरविषयक समुपदेशन अलका काकडे यांनी केले. तसेच, समूह चर्चेचेही आयोजन केले होते. समारोपाचा कार्यक्रम इंजिनिअर एस.एस .जोशी यांच्या प्रमुख उपस्थित झाला.
करिअरची 40 स्टॉल
विद्यार्थांनाशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणते क्षेत्र निवडावे हा सभ्रंम पडतो. त्यांना योग्य मार्गदर्शनचा अभाव आहे. या करिअर फोरममध्ये विविध करिअरचे मार्गदर्शन करण्यासाठी ४० स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.