आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी आल्या महालक्ष्मी; तयारीत रमल्या गृहलक्ष्मी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली, ओवाळिली कापुराने, भक्ता प्रसन्न झाली’ म्हणत बुधवारी दिवे लागणीला घरोघरी गौरींचे आगमन झाले. सकाळी साडेसात वाजल्यापासून मुहूर्त होता, तरी तिन्ही सांजेलाच महालक्ष्मींचे स्वागत झाले. माहेरी आलेल्या गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

सकाळपासून आनंदी वातवरणात महिलांनी सडा-रांगोळी केली. विविध प्रकारच्या रांगोळीचे स्टीकर आणि पाच बोटांची रांगोळी, छाप्याची गौरींची पाऊले अशा अनेक रांगोळ्या सुवासिनींनी आपल्या अंगणात रेखाटल्या.

आज होणार महापूजा, आरास पाहाण्याची उत्सुकता

‘चेन्नई एक्स्प्रेस’ साड्यांची रेस
गौरींना नेसवण्यात येणार्‍या साड्यांचे विशेष महत्त्व असते. चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील सिल्क साड्यांचा फिवर आता गौरींच्या साड्यांवरही पसरला आहे. देवयानी आणि अक्षरा साडीलाही महिलांची मोठी पसंती आहे. गौरीच्या सजावटीसाठी किमान दोन ते तीन दिवस आधीपासूनच साड्यांसाठी महिलांची गर्दी होती.

विविध रूपे गौरींची
अनिता देसाई यांच्या घरी तांब्यावर वाटी ठेवून त्याला रंगवून पारंपरिक पद्धतीने बसवलेल्या वेगळ्या लक्ष्मी पाहावयास मिळाल्या. बाळकृष्ण राशीनकर यांच्या घरी केवळ लोखंडी मांडव न मांडता, मांडवाला फोटो फ्रे म लावून प्रत्येक कप्पा सजवण्यात आला आहे. मुरारजी पेठेतील संपदा कुलकर्णी यांच्या घरी पारंपरिक साध्या पद्धतीने गौरी उभ्या करण्यात आल्या आहेत. सुमित्रा गाढवे यांच्या घरी माठावर झाकायच्या झाकणीला कणिक लावून त्याला रंगवून गौरी तयार करण्यात आल्या आहेत. या अशा विविध प्रकारच्या गौरी शहराच्या विविध भागांत पाहायला मिळाल्या.

दिवसभरात केव्हाही विसर्जन क रू शकता
मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असल्याने दिवसभर कधीही आपल्या सवडीनुसार गौरीचे विसर्जन करता येणार आहे. सहसा सायंकाळच्या वेळी गौरींचे विसर्जन करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
-मोहन दाते, पंचांगकर्ते