आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवासिनींना प्रतीक्षा गौरी घरा येण्याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गणपती बाप्पा येऊन विराजले की, घरोघरी गौरींच्या आवाहनाची लगबग सुरू होते. घरी येणार्‍या गौरींच्या स्वागताची मोठी तयारी सुरू आहे. त्यासाठी लागणार्‍या साहित्याची बाजारपेठांतून खरेदी झाली. आता प्रतीक्षा गौरी घरा येण्याची..

यंदा बुधवारी (दि. 11) सकाळी साडेसातनंतर दिवसभर गौरींचे आवाहन होईल. त्यामुळे दिवसाच सजावट करण्याची संधी मिळणार आहे. सजावट साहित्यासाठी बाजारपेठेत महिलांची लगबग सुरू असून, सोळा भाज्या आणि विशेष अलंकारांसाठी शोधक नजरा दिसत आहेत. नैवेद्यासाठी केळीच्या पानापासून ते विविध प्रकारच्या पूजा साहित्यासाठी महिलांनी सायंकाळ पर्यंत बाजारात गर्दी केली होती.

पाटील यांच्या गौरींसाठी साड्या
शिवगंगा गृह उद्योगच्या र्शीदेवी पाटील यांनी तांब्यावरच्या गौरींना साड्या तयार केल्या. तसेच अडणीवर उभ्या के ल्या जाणार्‍या गौरींसाठी साडी तयार करण्याचा नवा प्रयेाग यंदा केला. त्यांनाही बाजारात मागणी असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

गौरी आवाहन दिवसभर
यंदाच्या वर्षी अनुराधा नक्षत्राच्या मुहुर्तावर गौरींचे सकाळी 7.30 वाजल्यानंतर कधीही दिवसभर गौंरीचे आवाहन करावे. मोहन दाते, दाते पंचांगकर्ते

महालक्ष्मी सेटला मोठी मागणी
महालक्ष्मी सेट हा नवा प्रकार बाजारात यंदा दाखल झाला आहे. तांब्यावरच्या गौरींसाठी साडी, मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या बोरमाळ, व किरिट असे साहित्य या सेट मध्ये आहे. त्याची किंमत 120 रुपये आहे.