आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Geographic Information System Software Issue In Solapur Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीआयएस अहवाल हवेतच, सोलापूर मनपाला 65 लाखांचा गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जीआयएस प्रणालीच्या (जॉग्रॉफिक इन्फरमेशन सिस्टिम सॉफ्टवेअर) मदतीने शहर सर्वेक्षणसाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी एजन्सी नियुक्त केली होती. महापालिकेला अहवाल मिळाला नसला तरी सुमारे 65 लाख रुपये मनपाच्या तिजोरीतून खर्च केले आहेत. हा एक मनपाला गंडा घालण्याचाच प्रकार असल्याने अधिकार्‍यांच्या वेतनातून वसूल करावेत, अशी मागणी माजी महापौर प्रा.पुरणचंद्र पुंजाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

या सर्वेक्षणातून शहरातील मिळकती किती, पाइपलाइन नकाशे, ड्रेनेज लाइनची माहिती संकलित करणे, दिवाबत्ती तपासणे, पर्यटनसह शहराचा विकास करण्यासाठी महापालिकेला स्थानिक स्वराज्य संस्था (पुणे) यांना मक्ता दिला होता. एजन्सीशी महापालिकेने 25 मे 2008 रोजी करार केला. मात्र, अद्याप काम पूर्ण झाले नाही. महापालिकेने संबंधित मक्तेदारास 65 लाख रुपये दिले आहेत, तरीही काम अपूर्ण राहिल्याने ही रक्कम संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल करावी, अशी मागणी प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांनी केली. '

1.26 कोटीची योजना पाण्यात जाण्याचा धोका
जीआयएस योजनेसाठी एक कोटी 26 लाख 27 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाचा मक्ता निश्चित करण्यात आला असून, एजन्सीचे अधिकारी आशिष देवस्थळी यांना 65 लाख रुपये देण्यात आले. त्यांच्याशी करार झाल्याने त्यांनी नऊ लाख 10 हजार रुपये अनामत रक्कम दिली. पण 2008 साली वर्क ऑर्डर दिली नाही. त्यामुळे ही योजना पाण्यात जाण्याची शक्यता आहे.या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रय} केला असता तो होऊ शकला नाही.

असा होता योजना खर्च (रक्कम लाखात)
> प्राथमिक पाहणी अहवाल : 12.5
> सर्व्हे अहवाल सादर नंतर : 25
> पूर्णगणपत्रके सादर : 25
> प्रारूप प्रकल्प अहवाल दिल्यानंतर : 25
> अंतिम अहवाल दिल्यानंतर : 12
> अंतिम अहवाल राज्य नोडल एजन्सीकडे दिल्यानंतर : 12.5
> केंद्र सरकारची अहवालास मंजुरी मिळाल्यानंतर : 12.5