आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूप पालटलेल्या ‘शताब्दी’चे आगमन, नवीन गाडीत अँटी टेलिस्कोपीक पद्धत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- र्जमन टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला आणि प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आपले रूप पालटून आलेल्या ‘शताब्दी’चा नवीन रेक बुधवारी ट्रॅकवरून धावला. नवीन गाडीत अँटी टेलिस्कोपीक पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे रेल्वेचा अपघात झाला तर डबे एकमेकांत घुसणार नाहीत. डब्यांची बॉडी बाहेरून स्टेनलेस स्टिलची तर आतील बाजू अँल्युमिनियमची आहे. त्यामुळे अन्य डब्यांच्या तुलनेत डब्यांचे वजन कमी आहे.

कपुरथळा येथील रेल्वे डब्यांच्या कारखान्यातून एलएचपी (लिंक होपमॅन बुश) पद्धतीचे खास कोच तयार करण्यात आले. 9 डबे जोडून पुणे-सिकंदराबादचा ‘शताब्दी’चा रेक तयार करण्यात आला. पुणे-सिकंदराबाद धावणार्‍या शताब्दी एक्स्प्रेसला रेल्वे संघटनांच्या व सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे नवा रेक मिळाला आहे. मागील आठवड्यात तो कपुरथळा येथून पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाला आहे. ‘शताब्दी’च्या जुन्या डब्यांविषयी दैनिक ‘दिव्य मराठी’ने आवाज उठवला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
‘शताब्दी’चा वेग हा सुपरफास्ट गाड्यांपेक्षा अधिक असतो. गाडीचा वेग अधिक असताना देखील डब्यामध्ये अँडव्हान्स न्युमेलेटिक डिस्क ब्रेकची पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत गाडीचा चालक डिस्क ब्रेक लावू शकतो. हा डिस्क ब्रेक लावल्याने डबे उलटणार नाहीत, याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. डब्यांची अंतर्गत रचना देखील खूप चांगली आहे. प्रवाशांना प्रवासात थकवा जाणवणार नाही. डब्यांचे सस्पेन्शन चांगल्या दर्जाचे असल्यामुळे प्रवाशांना गाडी वेगात असतानाही हादरे जाणवणार नाहीत. अन्य वातानुकूलित यंत्रणेपेक्षा या गाडीतील वातानुकूलित यंत्रणा अधिक सक्षम आहे.