सोलापूर - कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचा प्रसाद घरपोच मिळण्यासाठी राज्यातील पोस्ट खात्याने पुढाकार घेतला आहे. भाविकांनी पोस्टामध्ये ८० रुपये भरल्यानंतर हा प्रसाद राज्यातील कोणत्याही शहरात आठवड्याच्या दरम्यान स्पीड पोस्टने घरपोच मिळणार आहे. राज्यातील १० हजार ९९० सबपोस्टामध्ये ही योजना कार्यान्वित आहे.
ई पेमेंट या सेवेत पैसे भरल्यास प्रसाद, ५ ग्रॅम कुंकू, ५ ग्रॅम हळद, ५ ग्रॅम काजू, ५ ग्रॅम किसमिस, ५ ग्रॅम खडीसाखर व पोस्टकार्ड साइजचा महालक्ष्मीचा फोटो हे साहित्य मिळणार आहे. राज्यातील अनेक भाविकांची कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी वर श्रद्धा आहे. मात्र धकाधकीच्या जीवनात कोल्हापूर येथे येण्यास वेळ मिळू शकत नाही. ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने ही योजना राबवण्याचे धोरण ठेवले आहे. ३१ डिसेंबरअखेर ही योजना कार्यान्वित केली आहे.
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पोस्ट खात्याने केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी ही योजना कार्यान्वित आहे. शारदीय नवरात्र उत्सव निमित्त मोठ्या संख्येने भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
कोट १ मंगळवेढा पोस्ट कार्यालयाने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद भाविकांसाठ केवळ ८० रुपयामध्ये घरपोच उपलब्ध करुन दिला आहे. ही योजना उत्तम असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
सोमनाथ गायकवाड, पोस्ट मास्तर, मंगळवेढा
कोट २ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा घरपोच प्रसाद हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. धावपळीच्या जीवनात माणसाला देव दर्शनासाठी जाण अशक्य बनत आहे.
राहुल भाकरे, भाविक आंधळगाव