आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका क्लिकवर मिळावा आपल्या धावत्या रेल्वे गाडीची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आपल्याला अपेक्षित असलेली गाडी वेळेवर धावतेय की उशिराने आणि सध्या ती कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती प्रवाशांना घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाल्याने गाडीच्या चौकशीसाठी स्थानकावर अथवा 139 ला कॉल करण्याची गरज राहिलेली नाही.


रेल्वे मंत्रालय व गुगलने प्रवाशांना रेल्वेविषयी इत्यंभूत माहिती व्हावी म्हणून नॅशनल ट्रेन इनक्वॉयरी सिस्टीमची निर्मिती केली. त्यानंतर रेल रडार तयार केले. रेल रडारवर भारतातील सर्व रेल्वेगाड्यांची प्रत्येक क्षणाची माहिती उपलब्ध होतेय. या रडारवर चालू क्षणी धावत असलेल्या रेल्वेचे ठिकाण समजते. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या इंटरनेटवर व मोबाइलवर आवश्यक ती माहिती मिळत आहे.


पिवळा, निळा आणि लाल रंग काय दर्शवतात
रडारवर आल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगात रेल्वे मार्ग दाखवण्यात आला आहे. यावर निळ्या व लाल रंगांमध्ये छोट्या आकरात रेल्वेची प्रतिकृती दाखवलेली आहे. यातील निळा रंग हा ती संबंधित रेल्वे वेळेवर धावत असल्याचे प्रतीक आहे, तर लाल रंगाची रेल्वे ही उशिराने धावत असल्याचे प्रतीक मानले जाते.


काय मिळते माहिती
रेल रडारवर अपेक्षित गाडीचे आरंभीचे स्टेशन व शेवटच्या स्टेशनच्या मार्गावरील गाड्यांना क्लिक केल्यानंतर त्या गाडीचा क्रमांक मिळतो. त्या गाडीने नुकतेच कोणते स्थानक सोडले, किती वाजता सोडले, याची माहिती मिळते. गाडीस उशीर झाला असल्यास किती वेळ उशिर झाला, पुढचे स्थानक कोणते, ते किती वाजता येईल हेही कळते.


ही यंत्रणा चालते कशी
भारतामध्ये एकूण 17 झोन आहेत. यात 69 विभाग आहेत. प्रत्येक विभागातील वाणिज्य नियंत्रण कक्ष प्रत्येक क्षणाची विभागातील गाड्यांची माहिती घेत असतो. रेल्वे मंत्रालय ही माहिती गुगलच्या मॅपकडे देते. त्यानंतर ही माहिती रेल रडारवर दिली जाते.