आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girija Oak And Utsha Jadhav News In Marathi, Marathi Film Industry

माय-लेकी नव्हे, मैत्रिणीच आम्ही; ग‍िरिजा ओक, उषा जाधव यांचा सोलपूरकरांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभिनयाच्या क्षेत्रात जाताना आई ठामपणे पाठीशी उभी राहिली. त्यामुळे करिअरला दिशा मिळाली. आयुष्यातील सर्वच गोष्टी आई म्हणून नव्हे मैत्रीण म्हणूनच शेअर केल्या. त्यामुळे माय-लेकीपेक्षा आमच्यात मैत्रिणीचे नाते अधिक समृद्ध झाले, अशा भावना स्टार अभिनेत्री गिरिजा ओक आणि उषा जाधव यांनी व्यक्त केल्या. या वेळी त्यांच्या आईनींही आपले अनुभव सांगत उपस्थितांशी थेट संवाद साधला. निमित्त होते ‘दिव्य मराठी’च्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त आयोजित माय-लेकी कार्यक्रमाचे.


‘मधुरिमा क्लब’च्या वतीने रविवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गिरिजा ओक हिने आपली आई पद्मश्री फाटक व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उषा जाधव यांनी आपली माता मंगला जाधव यांच्यासह उपस्थितांशी संवाद साधला. शोभा बोल्ली यांनी प्रकट मुलाखत घेतली.
.. आणि अश्रू ओघळले
उषाला आईने तुझ्यासाठी काय केले, हा प्रo्न विचारल्यावर उषा दोन शब्द बोलली आणि तिच्या तोंडून शब्दच फुटेना. तिचे शब्द गोठले अन् तिने अश्रूंना वाट मोकळी केली. आईने आपल्या शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवले होते. या तिच्या वाक्याने प्रेक्षकांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहिले.


आईमुळेच घडले
आईने ही गोष्ट कर, असे कधीच सांगितले नाही. तिच्या अनेक गोष्टी पाहून घडत गेले. माझ्या प्रत्येक निर्णयात ती होती. घरी कलेचेच वातावरण असले तरी याच क्षेत्रात करिअर करायचे ठरलेले नव्हते. आईच्या सांगण्यानुसार प्रथम ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि नंतर अभिनय करण्याचा निर्णय घेतला.’’ गिरिजा ओक, अभिनेत्री


तिच्यात क्षमता होती
रंगमंच पाहिला की सळसळणारी छोटीशी गिरिजा आजही आठवते. तिने कलेच्या क्षेत्रात जावे, याबाबत साशंक नव्हती. मात्र तिने ते जग डोळसपणे पाहावे, असे वाटत होते. सांगलीत एका कार्यक्रमात तिची कला पाहून वाटले ही कलावंतच होणार. ’’ पद्मश्री फाटक, गिरिजाची आई


आईचे कष्ट मोठे
आई अशिक्षित असली तरी पाच बहिणींनी शिकावे, यासाठी तिने कष्ट घेतले. तिने जन्माला घातले हीच मोठी संघर्षाची सुरुवात आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात सदैव पाठीशी राहणारी आई ग्रेटच आहे. सात वर्षाच्या अभिनय प्रवासात अमिताभ बच्च्न यांच्यासोबत काम करताना वेगळाच अनुभव मिळाला. ’’ उषा जाधव, अभिनेत्री


मुलीचे कौतुक वाटते
नातेवाईक म्हणत की मुलींना शिकवू नका. मात्र, मी मागे हटले नाही. मुलींना शिक वले. आज उषाने स्वत:चे असे नाव निर्माण केले. त्याचे कौतुक वाटते. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर पेढे घेऊन मंदिरात गेल्याचा क्षण अविस्मरणीय. ’’ मंगला जाधव, उषाची आई