आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नटसम्राट’साठी गाव सोडले, नोकरी सोडली अन् विश्वविक्रम केला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नाटकाच्या वेडापायी मंद्रूपच्या (ता. दक्षिण सोलापूर) तरुणाने गाव सोडले. ‘नटसम्राट’चे प्रयोग अव्याहतपणे करण्याचा ध्यास मनी होता. त्याने बँकेतली नोकरी सोडली. नाटकाच्या ओढीतून तो पुढे जात राहिला आणि सलग 31 तास 45 मिनिटे प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम केला. गिरीश देशपांडे या जिद्दी कलावंताचे हे यश सोलापूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे. निरंतर आठ प्रयोग करणारा हा जगातला पहिलाच कलावंत ठरला आहे. 2013 मधील गिनीज बुक व लिम्का बुकमध्ये या विक्रमाची नोंद झाली.

अभिनयाप्रती असलेल्या प्रेमापोटी गिरीश यांनी आधी मंद्रूप हे जन्मगाव सोडले, तर नंतर सोलापूरच्या जनता बँके तील नोकरीचा राजीनामा देऊन पुणे गाठले. नव्या शहरात अभिनयाचे आपले असे विश्व उभे केले. खस्ता खाल्या, कष्ट उपसले, अभिनयाच्या जोरावर प्रयोगांना उत्तम साथ मिळत गेली.

असा झाला प्रवास
2003 मध्ये मंद्रूप गावी ‘नटसम्राट’चा प्रयोग केला. सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात अनेक प्रयोग केले. 2005 मध्ये सोलापूरच्या दाजी पेठ जनता बँकेतील नोकरी पुण्यास बदलून घेतली. पुढे 2006 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. 2013 पर्यंत नटसम्राटचे राज्यभर अनेक प्रयोग केले. अमेरिकेच्या टीइम्स या संघटनेच्या 23 तास सलग सादर झालेल्या इंग्रजी नाटकाचा विक्रम मोडला.

असे मिळाले स्फुरण
पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात सोलापूरचा एक ग्रुप नटसम्राट नाटक करण्यासाठी येत असल्याचे कळाल्यानंतर डॉ. र्शीराम लागू यांनी आवर्जून प्रयोग पाहिला. गिरीश देशपांडे यांची अप्पा बेलवलकरांची भूमिका पाहून त्यांनी तोंडभरून कौतुक केले. देशपांडे यांनी नाटकाचे राज्यभर व्यावसायिक प्रयोग सुरू केले.

पत्नीने दिली खंबीर साथ
देशपांडे यांच्या प्रयोगाचा विक्रम झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मनीषा यांना अर्शू आवरता आले नाहीत. घरीच जेवण तयार करून निर्मिती संस्थेचा खर्च कमी करणारी पत्नी पाठीशी उभी राहिली म्हणून हे काम करू शकल्याचे देशपांडे म्हणाले. मुलगा अश्विन यानेही कधी राजा तर कधी सुहासची भूमिका करत साथ दिली.

सुख म्हणजे नटसम्राट
सुख, समाधान म्हणजे काय, हे नटसम्राट नाटक शिकवते. मला या जीवनी आपण काही तरी करू शकलो याचे समाधान वाटत आहे. सोलापूरच्या मातीतल्या मला सोलापूरच्या प्रेक्षकांनी दिलेली पहिली थाप ही खूप महत्त्वाची होती. ती शिदोरी घेऊनच पुढे जात आहे.’’ गिरीश देशपांडे, अभिनेता

जगात एक अनोखा विक्रम करणारा कलावंत हा सोलापूरचा आहे याचे कौतुक व अभिमान आहे. कष्टाने काहीही शक्य होते. तो नेहमीच नटसम्राटच्या प्रयोगासाठी धडपडत असे. त्याच्या तपस्येला यश प्राप्त झाले.’’ रेवणे उपारे, ज्येष्ठ दिग्दर्शक