आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश कुलकर्णी घेऊन येताहेत मराठी चित्रपट ‘हायवे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागराज मंजुळे याची भूमिका - Divya Marathi
नागराज मंजुळे याची भूमिका
सोलापूर - मुंबई-पुणे एक्स्प्रेस ‘हायवे’ या एवढ्याशा ‘वन लाइन'ला घेऊन सोलापूरचे दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे. ‘फॅन्ड्री’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयासह दिसणार आहेत.
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या आरभाट कलाकृती, खरपूस फिल्म्स कृत मराठी चित्रपट २४ जुलैला प्रदर्शित होत आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’नंतर वेगळा विषय घेऊन तो प्रेक्षकांपुढे येत आहे.

चित्रपटाचे असे आहेत शिल्पकार
चित्रीकरणसुधाकर रेड्डी यांनी केले आहे. वैभव जोशी यांच्या गीताला अमित त्रिवेदी यांचे संगीत आहे. पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. ध्वनी संयोजन अंथोनी रुबेन यांचे आहे. संकलन परेश कामदार यांनी केले असून वेशभूषा रचनाकार सीमा आरोळकर, कलादिग्दर्शन प्रशांत बिडकर, वेशभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य आहेत.

पुढे वाचा... नागराज मंजुळे याची भूमिका