आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरात मुलीची छेड; दोघा तरुणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाविद्यालयात जाताना एका मुलीची छेड काढल्याप्रकरणी बाल लैंगिक शोषण प्रतिबंध कलमाखाली चौघा तरुणांवर कुडरुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक झाली आहे. याबाबत न्यायालयात मुलीच्या वडिलांनी खासगी फिर्याद दाखल केली होती.

कुलदीप मारुती ठेंगल (वय 21), निलकंठ विष्णू चोपडे (वय 23) या दोघांना रविवारी रात्री अटक झाली. सोमवारी त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एस. व्होरे यांनी अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणातील अमोल भारत गायकवाड, सचिन महादेव वागदरे (रा. चौघेजण कु र्डू, ता. माढा) या दोघांना अटक झाली नाही. एक मुलगी पाच किलोमीटर अंतरावरील कुडरुवाडी शहरात कॉलेजला जात होती. त्यावेळी चौघेजण मुलीला छेडत होते

मुलीच्या वडिलांनी याबाबत कुडरूवाडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्होरे यांच्या न्यायालयात खासगी याचिका दाखल केली. लागलीच न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले. या प्रकरणी सरकारतर्फे शैलजा क्यातम, आरोपीतर्फे भारत कट्टे, अजित कट्टे, भोसले, मूळफिर्यादीतर्फे कांबळे (माढा) या वकिलांनी काम पाहिले.