आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गळफास घेतलेल्या त्या मुलीचा अखेर मृत्यू; नववी नापास झाल्याने होती निराश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नववी नापास झाल्याने एका चौदा वर्षाच्या मुलीने 15 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील दहा दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी दुपारी तिची प्राणज्योत मालवली.

प्रांजली गायकवाड ( रा. भैरू वस्ती) असे त्या मुलीचे नाव आहे. प्रांजली ही विजापूर नाका येथील शाळेत शिकत होती. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी मुलांना शिक्षण देऊन मोठे करण्याची प्रांजलीच्या आई-वडिलांची इच्छा होती. प्रांजलीची अभ्यासात हवी तशी प्रगती नव्हती. नववीत ती नापास झाली. 15 जून रोजी सायंकाळी घरात तिने गळफास घेतला. वडिलांनील तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत ती बेशुद्धावस्थेत गेली होती. खासगी रुग्णालयातून 25 जून रोजी तिला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.