आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give 820 Rupee Subsidy For Sugarcane Price Vijaysinha Mohite

ऊसदरासाठी ८२० रुपये अनुदान द्या - विजयसिंह मोहिते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - सरकारने ठरवून दिलेला एफआरपी (वैधानिक ऊसदर) आणि साखरेचा दर यात ८२० रुपयांची तफावत आणि तूट आहे. ती भरून काढण्यासाठी सरकारने साखर कारखाने अथवा थेट शेतकऱ्यांच्या नावे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य साखर संघाचे अध्यक्ष, खासदार विजयसिंह मोहिते यांनी केली. दूध व्यवसायातही शेतकऱ्यांना प्रतिलिटर दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

महाळुंग (ता. माळशिरस) येथे खासदार मोहिते यांच्या निधीतून बसवलेल्या हायमास्ट दिवे आणि प्रवासी निवारा शेडचे गुरुवारी उद्घाटन झाले. तसेच यमाईदेवी सोसायटीच्या नव्या कार्यालयाचे आणि पंचायत समितीच्या सदस्या मीनाक्षी यादव यांच्या निधीतून शालेय मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. या वेळी ते बोलत होते.

खासदार माेहिते म्हणाले, सरकारने एफआरपी दर ठरवून दिला. मात्र तो देण्यासाठी कसलीही तजवीज केली नाही. आज साखरेचे दर प्रतिक्विंटल २१०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. या अडचणीच्या परिस्थितीत एफआरपीनुसार ऊसदर देण्यासाठी सरकारने प्रतिटन ८२० रुपये अनुदान देण्याची गरज आहे. यासंदर्भात आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली आहे.

सध्या कोणत्याच शेती उत्पादनाला दर मिळत नसल्याने शतेकरी अडचणीत आल्याचे मोहिते यांनी सांगितले. दूध धंद्याचीही तीच गत झाली आहे. एक लिटर दूध उत्पादनासाठी २८ रुपये खर्च येतो. परंतु दुधाला प्रतिलिटर १९ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे प्रतिलिटर दहा रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. तसेच गारपीट अवकाळी यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

या वेळी सहकारमहर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र सावंत, संचालक नानासाहेब मुंडफणे, महादेव शिंदे, संभाजी घोंगाणे, डाॅ. हरिश्चंद्र सावंत, अनिल जाधव, दिलीप रेडे, ज्ञानेश्वर मुंडफणे, सुभाष जाधव,विष्णूपंत जमदाडे, धनंजय देशमुख, रतनसिंह रजपूत, अमोल पाटील, अर्जुन भगत, सुरेश गुंड उपस्थित होते.

स्थिरीकरणाविषयी दिशाभूल
उन्हाळीहंगामासाठी उजनी नीरा कालव्यातून पहिले आवर्तन मिळाले आहे. या कालव्यांतून दुसरे आवर्तन मिळालेच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. सध्या यासाठी पाणी शिल्लक आहे. त्याचे योग्य नियोजन व्हायला हवे.स्थिरीकरण योजनेविषयी काही पुढारी जनतेची िदशाभूल करत आहेत. भविष्यातील उजनीवरील पाण्याचा ताण पाहता ही योजना पूर्णत्वास जायला हवी. तसेच आघाडी सरकारने या योजनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याबद्दल खासदार मोहिते यांनी खंत व्यक्त केली.

देशात १६५ लाख टन साखर राहील शिल्लक
सरकारचेअनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल की नाही, याची शंका असल्यास थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करावे. कारखानानिहाय ऊस उत्पादकांची नावे आणि त्यांच्या उसाची आकडेवारी सरकारला देण्यास तयार आहोत. तसेच गतवर्षीची आणि यंदाची अशी देशात एकूण १६५ लाख टन साखर शिल्लक राहील, अशी चिंता खासदार मोहिते यांनी व्यक्त केली.