आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Give Minimum Salary, Concession To Security Guards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षा रक्षकांना किमान वेतन, सवलती हव्यातच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खासगी सुरक्षा रक्षकांना किमान वेतन, सुट्ट्या आणि इतर सवलतींचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळांकडे त्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्याचे काम तातडीने करण्याच्या सूचना कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी अधिका-यांना दिल्या.

कामगार सहआयुक्त बी. जे. कुलकर्णी, भारतीय सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष रेशम झा, सरचिटणीस बी. सी. झा आदी या वेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, सुरक्षा रक्षकांनी मंडळाकडे नोंदणी न केल्यामुळे किमान वेतन, विमा, सुट्ट्या, कामाचे तास अशा अनेक सुविधांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांना अधिक तणावात काम करावे लागते. संघटीत कामगारांसारखे लाभ सुरक्षा रक्षकांनाही मिळणे आवश्यक अाहेत. त्यासाठी मालक आणि एजन्सींची शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळांकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या, त्यांच्या समस्या आदींबाबत सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातील सुरक्षा रक्षकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याची जलदगतीने कार्यवाही करण्यात यावी,’ अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.