आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची हमी द्या, मगच विमानसेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर-मुंबईविमानसेवा सुरू करण्यासाठी मेहेर कंपनीचे अधिकारी तयार आहेत. परंतु त्यांना पहिल्या तीन महिन्यांसाठी प्रवाशांची हमी पाहिजे. तसा प्रस्तावच कंपनीने सोलापूरच्या उद्योजकांपुढे ठेवला आहे. तीन महिन्यांच्या तिकीट विक्रीची हमी मिळाल्यानंतर लगेचच आसनी विमानसेवा सोलापुरातून सुरू करू, अशी ग्वाही मेहेर विमानसेवेचे संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी दिली. खासदार विजयसिंह मोहिते रणजितसिंह मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी हॉटेल त्रिपुरसुंदरी येथे मेहेर विमानसेवेच्या संचालक उद्योजक प्रतिनिधींची बैठक झाली. उद्योजकांनी सूचना नोंदविल्या. सोलापूर विमानतळाचे प्रमुख प्रमोद गायकवाड, उपमहापौर प्रवीण डोंगरे, केतन शहा, पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर, किशोर चंडक, संतोष कौलगी, अनिल श्रीवास्तव, सज्जन निचळ, माजी महापौर नलिनी चंदेले, सोलापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सिध्देश्वर बमणी, डॉ मिलिंद शहा, बाबूराव घुगे, राम रेड्डी, राजू राठी, िजतू राठी, मेहेर विमानसेवेचे मोहम्मद कुरेशी, फहाद आदी उपस्थित होते. मागील पंधरवड्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने इअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली होती. यानंतर मेहर विमानसेवा व्यवस्थानासोबत बैठक झाली.

...तर उजनी धरणातून सी प्लेन
‘मेहेर’ची मुंबई-शिर्डी मुंबई-लोणावळा सेवा सुरू आहे. सी प्लेनमुळे ते समुद्रात, तलावात, नदीमध्ये विमान उतरवू शकतात. सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यास सी प्लेनच्या माध्यमातून उजनी धरणातूनही विमानसेवा सुरू करू शकतात. १० फूट पाण्यात हे विमान उड्डाण घेते.

सोलापूर. विमानसेवेसंदर्भातील बैठकीला मेहेर कंपनीचेे संचालक, उद्योगपती, खासदार विजयसिंह मोहिते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हॉटेल त्रिपुरसुंदरी येथे ही बैठक झाली.

आसनी सेवेची तयारी
सिद्धार्थवर्मा यांनी विमान तिकीट हमीचा मुद्दा मांडला. आसनी विमानसेवेचा प्रतिसाद पाहून १८ आसनी सेवा सुरू करू. विशेष सवलत देऊन पाच हजारांपर्यंत सोलापूर-मुंबईचा दर ठेवू. विमानसेवेला चांगला प्रतिसाद िमळेल, अशी आशा व्यक्त केली. खासदार मोहिते म्हणाले, विमानसेवा कायम ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मेहेर कंपनीने माफक दर ठेवावेत अशी सूचना केली आहे. रात्री विमान सोलापूर मुक्कामी आले, तर सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूरहून मुंबईसाठी उड्डाण शक्य होईल.