आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Warning To Self Immolation In Front Of Central Home Ministers House

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुलीच्या अंगावर जीप गाडी घालून जखमी करणार्‍या तरुणावर पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसात दोन दिवसांपूर्वी फिर्याद दिली आहे. पण कसलीच कारवाई झालेली नाही. पोलिसांनी मुलीवर जिवघेण्या हल्ल्याचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास मी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरासमोर आत्मदहन करेन, असा इशारा गंभीर जखमी मुस्कान मुजावर यांच्या आई आसमा मुजावर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

7 जुलै रोजी मी आणि दोन मुली मुस्कान, रूकसार यांच्यासोबत हॉटेल आलिशानसमोरील रस्त्याकडेला थांबलो होतो. मुस्कानची नेहमी छेड काढून त्रास देणारा तरुण आला. तो शिंदे यांचे स्वीय साहाय्यक अकबर शेख यांचा मुलगा आहे. एनटीपीसी भारत सरकार असे नाव लिहिलेल्या जीपधून (एमएच 13 एएक्स 1152 ) तो आला आणि मुस्कानच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ती दोन ते अडीचशे फूट फरफटत गेली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांची टाळाटाळ
फिर्याद द्यायला गेल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. तरुणाच्या बाजूने कागदपत्रे तयार करून तक्रार मागे घेण्यास मलाच सांगतिले. अद्याप गुन्हेगार मोकाट फिरतोय. त्यावर कारवाई व्हावी. तरुणाच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलिस पाठराखण करीत असल्याचा दावा त्यांनी केला.