आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gokulashtami Krishna Birth Celebration In Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे गोकुळाष्टमीची आख्यायिका; काल्यासाठी सोलापूरकारांची लगबग सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उत्सवप्रिय सोलापूरकर सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत त्यासाठी आवश्यक असणार्‍या साहित्यांच्या खरेदीसाठी लगबग आहे, तर ठिकठिकाणी दहीहंड्या बांधणे, मंदिरातील मूर्त्यांची सजावट करणे आदी कामे सुरू आहेत.

गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व

‘काला’ म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचे मिश्रण होय. तसेच काला म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रीकरण होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी कार्याचे प्रातिनिधित्व करतो. काल्यात पोहे, दूध, दही, ताक व लोणी यांचा समावेश होतो.

हा करावा जप: ओम नमो भगवते वासुदेवाय नम:

ही आहे आख्यायिका : श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी उपवास करून रात्री 12 वाजता देवास पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्णाने गायी चारताना स्वत:ची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्यांचा काला केला व तो सर्वांसह खाल्ला. म्हणून यादिवशी काला करणे व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

शाळांमध्येही झाली गोकुळाष्टमीची तयारी
प्राथमिक शाळांमध्ये एक दिवस आधीच दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. बाळगोपाळांना कृष्णरूप देण्याच्या हक्काच्या दिवशी पालक त्यांच्या साजशृंगारासाठी पोषाख, अलंकार, किरीट आदी भाड्याने आणण्यात मग्न आहेत.

रंगवलेली हंडी व साहित्य
दहीहंडीमुळे लक्ष्मी मार्केट, बाळीवेस, जिल्हा परिषदेजवळ, विजापूर नाका, आसरा चौक, कोर्ट परिसर, सिव्हिल, कुंभार गल्ली आदी भागांत रंगवलेली मडकी विक्रीस आलेली आहेत. 10 रुपयांपासून यांची किंमत असून दोरीच्या सजावटीचे साहित्य, लेस, क्रेपपट्टय़ाही विक्रीस उपलब्ध आहेत.

जोशमध्ये ठेवा होश
2009 मध्ये जोडभावी पेठेत घडलेल्या घटनेत योग्य सुरक्षासाहित्य आणि सेवा उपलब्ध नसल्याने माझ्या जावयाचा जीव गेला. शहरातही मोठमोठय़ा हंड्या फोडल्या जातात. आपत्कालीन व्यवस्था होणे आवश्यक आहे.’’ सिद्राम जिंदम, नागरिक
साजशृंगाराला मागणी
बाळकृष्णाच्या मूर्तीस सजवायच्या साहित्याला बाजारात मागणी आहे. टोप, टोपी, बासरी, मोत्यांच्या माळा, सदरे, जरीपटका तसेच मोरपिसांचा मुकुट आदी साहित्यांची उलाढाल असते. ’’
प्रमोद अपशिंगे, मालक, सुगंधी ट्रेडर्स