आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात विद्यार्थ्याने पळवली शिक्षकाची सोनसाखळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सर..मी तुमचा विद्यार्थी. अमूक या साली आपल्या वर्गात शिकत होतो. मला होटगी रोडला जायचे आहे. प्लीज दुचाकीवर लिफ्ट द्या म्हणून शिक्षकाला एका तरुणाने विनंती केली. होटगी रस्त्यावरील नवोदय नगराजवळ गेल्यानंतर दुचाकी थांबवण्यास सांगितले. मोबाइल लावायचे आहे म्हणून सराचांच मोबाइल त्याने घेतला. त्याचरम्यान, सरांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. हा विचित्र प्रसंग आलाय वसंत गुगे (रा. रामलालनगर, होटगी रोड) यांच्यावर. त्यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमाराला घडली. र्शी. गुगे हे नवी पेठेत साहित्य खरेदी करून घराकडे दुचाकीवरून जात होते. नितीन जाधव विद्यार्थी असल्याचे सांगत लिफ्ट मागितली. त्यानंतर मधे थांबवून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेऊन तो पळून गेला.