आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासांत मंगळसूत्र, सोन साखळी हिसकावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बुधवारी दोन तासांत मंगळसूत्र हिसकावण्याच्या दोन, तर सोनसाखळी काढून घेतल्याची एक घटना घडली. दोन तासात आठ तोळे दागिने चोरीला गेले आहेत. बुधवारी चोरांनी जणू कहरच केला. सिव्हिल चौकाजवळील सिद्धार्थ चौक, विद्यानगर येथे राहणारे मालती मधुसूदन जोशी या सकाळी आठच्या सुमाराला कट्ट्यावर बसल्या होत्या. दोन तरुण दुचाकीवर आले. जीन कॉलनी कुठे आहे, असे विचारत त्यांना बोलण्यात गुंतवले. काही क्षणात त्यांच्या गळ्यातील चार तोळे मंगळसूत्र हिसकावले. सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
दुसरीघटना : विजापूररोड गोकुळधामजवळ घडली. सुलोचना जानबा पंचकट्टी यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. सकाळी नऊला घराजवळील पिठाच्या गिरणीजवळ थांबल्या होत्या. तुम्ही शिंदे मॅडमना ओळखता का?, अशी थाप मारून त्यांना चाकूचा धाक दाखवत दोन तोळे सोन्याचे गंठण पळवले. दोघे तरुण दुचाकीवर आले होते.

तिसरीघटना : महापौरबंगल्याजवळील एका शोरूमध्ये दुचाकी सर्व्हिसिंगला देऊन जाताना दोघा तरुणांनी आनंत बिंदू जोशी (रा. गौडाअर्पाटमेंट, रामलाल चौक) यांना चौकात थांबविले. आम्ही पोलिस आहोत, काल चार लाखांचा गांजा पकडला आहे. तपासणी सुरू आहे. तुम्ही सोनसाखळी काढून ठेवा असे म्हणत ते काढण्यास सांगितले. दोन तोळयाची साखळी काढल्यानंतर कापडात बांधून देण्याचा बहाणा करून दोघे दागिने घेऊन पळून गेले. सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना सकाळी पावणे दहाला घडली.
पोलिसांनी केली नाकाबंदी
यातीन घटनानंतर पोलिसांनी शहरात विविध भागात नाकाबंदी करून तपासणी मोहीम हाती घेतली. काही संशयित वाहनांची तपासणी करून माहिती घेण्यात आली. पण, चोरटे काही हाती लागले नाहीत. चो-यांच्या सत्रावर पोलिस अंकुश कधी ठेवणार आहेत.