आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांवर कुबेर कृपा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- यंदाच्या दिवाळीत सराफ व्यापार्‍यांवर कुबेराची मोठी कृपा झाली. धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन अशा या तीन दिवसांत सुमारे 15 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. दिवाळीत लक्ष्मी-कुबेराचे पूजन होते. त्यासाठी सोन्याच्या नाणी आणि लक्ष्मी-कुबेराच्या सोन्या-चांदीच्या प्रतिमांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. धनत्रयोदशी दिवशीच खरेदीची खरी दिवाळी झाल्याचे व्यापारी म्हणाले. प्रकाशाच्या दीपोत्सवात सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

लक्ष्मी, कुबेर पूजनात चलनी नोटा आणि सोन्याच्या नाणी पूजल्या जातात. ही धनाची पूजा असते. गुंतवणुकीतून सुवर्णधन मिळवणे आणि त्याची पूजा करणे अशी प्रथा आहे. उद्योजक, व्यापारी आणि नोकरदार मंडळींनी यंदा सोने-चांदीच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात पैसा ओतला. बदल्यात सुवर्णधन मिळवले. रविवारी सायंकाळी त्याची पूजा केली. सोमवारी पाडवा आहे. या दिवशी लक्ष्मी, सरस्वतीची पूजा होते. म्हणजेच नव्या वह्या, रोजमेळ, कीर्द यांसह लक्ष्मी म्हणजेच सोन्याचीही पूजा होते. अमावास्या असतानाही रविवारी सायंकाळपर्यंत पेढय़ांमध्ये ग्राहकांची वर्दळ होती.

सोने खरेदीस प्रचंड प्रतिसाद
पु. ना. गाडगीळांच्या पुण्यातील सुवर्णपेढय़ांमध्ये मी काम केले. त्याची शाखा सोलापुरात सुरू झाल्यापासून इथले व्यवस्थापन पाहतोय. पुण्याच्या तुलनेत सोलापूरकर खरेदी करतात, हे मी अनुभवतोय. याचाच अर्थ सोलापूरकरांना हॉलमार्क प्रमाणित सोने हवे होते.’’ अमित जाधव, व्यवस्थापक, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स

देवी प्रतिमांसह दर्जेदार दागिने
दिवाळीनिमित्त अनेकविध प्रकारच्या सोन्या-चांदीच्या वस्तू दालनात दाखल झाल्या. लक्ष्मी-सरस्वती-कुबेराच्या प्रतिमांसह दर्जेदार दागिने उपलब्ध केले. धनत्रयोदशीलाच मोठी विक्री झाली. पाडव्यासाठीही मोठी खरेदी सुरू आहे.’’ किरण अंगडी, व्यवस्थापक, वामन हरी पेठे ज्वेलर्स