आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे दर उतरले; पेढय़ा चकाकल्या.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्याच आठवड्यात सोन्याचे दर 26 हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता बाजारपेठेतून वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांचे डोळे मुहूर्ताकडे लागून राहिले होते. त्यांना अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त मिळाला. पण दरात फारशी घट झाली नाही. मंगळवारी (ता. 29) 30 हजार 700 रुपये दर होता. शुक्रवारी त्यात 300 रुपयांची घट झाली. तरीही सुवर्णपेढय़ा उजळून निघाल्या. शुक्रवारी सराफ बाजारात सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

अक्षय्यतृतीयेला गूंजभर तरी सोने विकत घेण्याची परंपरा आहे. त्याला साद देत सराफ बाजार ग्राहकांनी फुलला. मोठी सुवर्णदालनेही उजळून निघाली होती. गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या ग्राहकांनी वेढण्यांना प्रथम पसंती दिली. दागिने प्रकारांना महिलांची पसंती होती, असे सराफ व्यापारी म्हणाले.
रत्नांना मागणी
मुहूर्तावर रत्ने घेण्याची परंपरा आहे. यंदाच्या अक्षय्यतृतीयेला पुष्कराज रत्ने घेण्यासाठी ग्राहक पुढे आला. सोन्यापेक्षा या रत्नांची चांगल्या प्रकारे विक्री झाली. शंतनू शाह, संचालक, शाह ज्वेलर्स
वेढण्यांना पसंती
बहुतांश ग्राहकांनी वेढण्यांना पसंती दिली. मोठी गुंतवणूक करू इच्छिणार्‍या ग्राहकांनी सोन्याच्या बिस्किटांची मागणी केली. एकूणच चांगल्या प्रकारे सोन्याची विक्री झाली. रोहित बिटला, सराफ व्यापारी