आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Medal For Top Student In Solapur University

विद्यापीठ सुवर्णची संख्या झाली दहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कला आणि वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेत अव्वल येणार्‍यांना सोलापूर विद्यापीठातर्फे सुवर्ण पदक देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. एकूण पदकांची संख्या आता दहा झाली आहे.

प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने संचालक विजय कपूर यांनी एक-एक लाखांची देणगी दिली. ती स्वीकारण्यास परिषदेने मान्यता दिली. सभेचे सचिव म्हणून महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक, प्रभारी कुलसचिव प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे यांनी काम पाहिले. परिषदेची ही 52 वी सभा होती. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी होते.

सोलापूर विद्यापीठ व सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोंडी शाखेतर्फे विद्यापीठातील नियमीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना संगणक किंवा लॅपटॉप घेता येईल. या योजनेस व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. कर्जाचे 36 महिन्यांचे व्याज विद्यापीठ भरणार आहे. विद्यापीठ परिसरातील एम. ए. एज्युकेशन अभ्यासक्रम बंद करण्याची विद्या परिषदेची शिफारस स्वीकाण्यात आली. विद्यापीठ कार्यालयीन कामकाजासाठी दोन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.

बी. एस्सी. भाग एक व अभियांत्रिकी प्रथम वर्ष यासाठीच्या प्रo्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने पाठवणे व उत्तरपत्रिकाही ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करणे याबाबतची शिफारस परीक्षा मंडळ व विद्यापरिषदेने केली होती. त्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 जुलै 2013 पासून सुधारित दराने अधिकच्या कामाचा मोबदला देण्यात येणार आहे. यास मान्यता देण्यात आली.