आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिशच्या बहाण्याने नऊ तोळे पळवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सेल्समन आहोत म्हणून काही तरुण घरात येतात. पॉलिश करण्याचे पावडर आम्ही विकतो. तांब्याची, चांदीची भांडी पॉलिश करून दाखवतो म्हणून सांगतात. काही वेळाने सोन्याचेही दागिने पॉलिश करण्याचा बहाणा करून घेऊन जातात. अशा दोन घटना गुरुवारी घडल्या आहेत. एमआयडीसी परिसरात 17 तोळे, तर जुळे सोलापूर परिसरातील शिवगंगानगर भाग दोनमध्ये नऊ तोळे दागिने पळविण्यात आले आहेत.

निर्मला परमेश्वर वाघमोडे (रा. शिवगंगानगर) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. यांच्याजवळील नऊ तोळे दागिने चोरीस गेले आहेत. दोघे तरुण गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात आले. पॉलिशचा बहाणा करीत दागिने डब्यात टाकून पाण्यात ठेवले. त्या दरम्यान, दागिने घेऊन पळून गेले.

मंगळसूत्र लंपास
दुसरी घटना गुरुवारी मल्लिकार्जुन मंदिराजवळ एका महिलेच्या गळ्यातून एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. प्रतिमा र्शीशैल कल्लूरकर (रा. उत्तर कसबा) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. मल्लिकार्जुन मंदिरासमोर रथाचे दर्शन घेताना गर्दीत मंगळसूत्र हिसकावण्यात आले.