आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

22 लाखांचा घातला गंडा; सातजणांना सक्तमजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वीस हजार किमतीचे सोने चार हजार दराने देण्याच्या बहाण्याने पुणे जिल्ह्यातील वडगाव धायरी (ता. हवेली) येथील कृष्णा पोकळे यांना 22 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सात जणांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी शनिवारी हा निकाल दिला.

आसिफ गफूर शेख (वय 49, रा. केशवनगर), बाळू तुकाराम कलुबर्मे-पाटील (वय 40, रा. डोणगाव), अंकुश शंकर पवार (वय 28, गुंजेगाव), बाळू कृष्णा पाचकवडे (वय 40, रा. आंबेडकरनगर), मल्लिकार्जुन विठ्ठल बंडा (वय 52, रा. दत्तनगर), दाऊद अब्दुल शेख (वय 64, रा. शास्त्रीनगर), युसूफ महिबूब विजापुरे (वय 45, रा. सलगरवस्ती) यांना शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. आज शिक्षा देताना बाळू कलुबर्मे-पाटील न्यायालयात उपस्थित नव्हता. तर आठवा संशयित बालाजी (पूर्ण नाव नाही) हा घटना घडल्यापासून
गायब आहे.

पाच जुलै 2006 रोजी ही घटना उघडकीस आली होती. सदर बझार पोलिसात पोकळे यांनी फिर्याद दिली होती. वडगाव धायरी येथे मूळचे सोलापूरचे अंकुश पवार भंगार दुकान चालवत होते. त्यांच्यामुळे सोलापूरातील संबंधित आरोपीशी ओळख झाली. सोलापुरात स्वस्तात सोने देतो म्हणून त्यांना आमिष दाखवण्यात आले. सोलापुरात बोलावून घेऊन पुणे नाक्याजवळ पावणेतीन लाख, सात रस्ता येथे पावणे पाच लाख, एकदा दहा लाख तर चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे पाच लाख असे 22 लाख 50 हजार रुपये काढून घेतले. पण, दागिने काही दिलेच नव्हते.
असे बिंग फुटले
पोकळे यांना चित्रदुर्ग येथे मित्राकडून घेऊन सोने देतो म्हणून गेले. पण, तिथे गेल्यानंतर डीबीचे पोलिस तपासणी करण्याचा बहाणा केला. पोलिसांना आम्ही सांभाळून म्हणून पोकळे यांना पाठवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक वांडेकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे व्ही. एन. देशपांडे, आरोपीतर्फे यू. डी. जहागीरदार, अ‍ॅड. रियाज शेख या वकिलांनी काम पाहिले.