आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळसूत्र चोरटे जेरबंद; घटनांना लागला ब्रेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात धुमाकूळ घालणार्‍या दोघा मंगळसूत्र चोरांना फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केल्यामुळे या घटनांना बे्रक लागला आहे. मागील दोन महिन्यांपासून सुमारे 37 गुन्हे घडले होते. पोलिसांच्या तपासात तब्बल 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मागील आठ दिवसांपासून पोलिसांच्या तावडीत ही टोळी असल्यामुळे या घटनांना ब्रेक लागला आहे. या गुन्ह्यातील आणखी एक साथीदार गायब असल्यामुळे त्याचाही शोध सुरूच आहे.

विशेष म्हणजे मागील शुक्रवारीच जुळे सोलापुरातील भाग्यश्री पार्क येथील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर दोघा चोरांना अटक झाली आहे. यावरून आणखी चोरटे शहरात फिरताहेत अशी शंका येत आहे. पण काहीही असो मंगळसूत्र चोरींच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ
फौजदार चावडी पोलिसांनी अटक केलेल्या दोन मंगळसूत्र चोरांना जेल रोड पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली. अजय उर्फ यल्लप्पा गायकवाड (वय 23,रा. लिमयेवाडी), राहुल अंबादास जाधव (वय 21, रा. पारशी विहार, रामवाडी) अटकेत आहेत. मागील शुक्रवारी फौजदार चावडी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. फौजदार चावडी, विजापूर नाका, सदर बझार हद्दीत सुमारे 18 गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केले होते. 25 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. कमलाबाई अंबाजी नुरा यांचे मंगळसूत्र हिसकावल्या प्रकरणी जेल रोड पोलिसांनी ही कारवाई केली.
‘त्या’ सराफाने दागिने वितळवले कसे?
संशयित गायकवाड व जाधव या दोघांनी चोरलेले मंगळसूत्र मोदी येथील सराफ ज्वेलर्स उपरे यांच्याकडे गहाण ठेवत व कालांतराने विकत. यामुळे दागिने वितळवल्याचे समोर येत आहे. दागिन्यांची पावती नसताना ते दागिने कसे गहाण ठेवून घेत आणि विकत घेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसांना खोलात जाऊन चौकशी केल्यास आणखी धक्कादायक माहिती समोर येण्यास मदत होईल.