आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालदिनी बाळगोपाळांचे असेल गुगल डुडल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विशेषदिनीगुगल संकेतस्थळाचे डुडल काय असेल याविषयी सर्वांनाच कायम आकर्षण असते. यंदाचा बालदिनही असाच काहीसा आहे. बालदिनासाठीचे डुडल बनविण्याची संधी गुगलतर्फे लहान मुलांना दिली जाते. यासाठी घेतलेल्या स्पर्धेत देशातील १५०० शाळांमधील सुमारे १० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सोलापुरातीलही अनेक बालकलाकरांचा सहभाग आहे हे विशेष.

असेहोते संघ : यास्पर्धेतील अंतिम विजेत्यांची घोषणा १२ नोव्हेंबरला होणार असून त्याने तयार केलेले डुडल बालदिनी गुगलच्या वेबसाइटवर झळकेल. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत माय इंडिया या विषयावर डुडल तयार करावयाचे होते. प्रत्येक गटातून चार याप्रमाणे १२ जणांची अंतिम फेरीत निवड करण्यात येत आहे.

नामवंतांसह भारताचा जागर
*गुगलच्याहोमपेजवर महात्मा गांधी, ताज महाल किंवा अमिताभ बच्चन यांच्या छबींसह माय इंडिया या िवषयावर आधारित राष्ट्रीय दिनी तसेच सणासुदीच्या दिवशी या छबी दिसणार असल्याचे जाहीर केले आहे. बालदिनी १४ नोव्हेंबरला यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रे गुगलवर लावण्यात येतील. गुगलतर्फे होणाऱ्या डुडल फॉर गुगल या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ही निवड होते. आम्हीही शाळेतून अशी चित्रे काढून पाठवली आहेत.” अशोकतंटक, कलाशिक्षक,दमाणी विद्या मंदिर

आनंद वाटला
*गुगलने यंदाच्यावर्षी ही चांगली संधी दिली होती. यात माझ्यासह माझ्या मित्रांनी सहभाग नोंदविला आहे. याचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी लागेल पण या मोठ्या व्याप्त गोष्टीत मी देखील सहभागी झालो याचा मला आनंद आहे. मी माझ्यापरीने चांगले चित्र भारतीय संस्कृती दिसेल असा प्रयत्न केला आहे.'' केदारकुमठेकर, पोलिसपब्लिक स्कूल
देश आणि संस्कृती
चिमुकल्यांच्याकुंचल्यातून दिसणारा भारत, त्यांच्या संकल्पना अशा गुगलच्या या प्रयत्नांत अनेक बाळगोपाळांनी उत्साहाने रंग भरले आहेत. त्यांच्या मनातील चित्र कागदावर उतरवण्याचा हा मार्ग होता. यात मुलांनी अत्यंत कल्पकतेने आपली चित्रे साकारली आहेत. राजस्थानची ओळख असणारे उंट, वाळवंट, देऊळ आणि रंगीबेरंगी फेटे, देवाची भूमी अशी ओळख असलेला केरळ, सागरी किनाऱ्याचे बेट, मुंबई, बॅकवॉटरमधून जाणारी बोट, हत्ती आणि मुखवटे, तर वाघ आणि एकशिंगी गेंडा आणि चहासाठी जगप्रसिद्ध असलेला आसाम आदींचा यात समावेश आहे.