फोटो - बालदिनानिमित्त गुगल डुडलसाठी पाठविण्यात आलेली बालकलाकरांची चित्रे
सोलापूर - विशेषदिनी गुगल संकेतस्थळाचे डुडल काय असेल याविषयी सर्वांनाच कायम आकर्षण असते. यंदाचा बालदिनही असाच काहीसा आहे. बालदिनासाठीचे डुडल बनविण्याची संधी गुगलतर्फे लहान मुलांना दिली जाते. यासाठी घेतलेल्या स्पर्धेत देशातील १५०० शाळांमधील सुमारे १० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सोलापुरातीलही अनेक बालकलाकरांचा सहभाग आहे हे विशेष.
असे होते संघ
या स्पर्धेतील अंतिम विजेत्यांची घोषणा १२ नोव्हेंबरला होणार असून त्याने तयार केलेले डुडल बालदिनी गुगलच्या वेबसाइटवर झळकेल. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘माय इंडिया’ या विषयावर डुडल तयार करावयाचे होते. प्रत्येक गटातून चार याप्रमाणे १२ जणांची अंतिम फेरीत निवड करण्यात येत आहे.
देश आणि संस्कृती
चिमुकल्यांच्या कुंचल्यातून दिसणारा भारत, त्यांच्या संकल्पना अशा गुगलच्या या प्रयत्नांत अनेक बाळगोपाळांनी उत्साहाने रंग भरले आहेत. त्यांच्या मनातील चित्र कागदावर उतरवण्याचा हा मार्ग होता. यात मुलांनी अत्यंत कल्पकतेने
आपली चित्रे साकारली आहेत. राजस्थानची ओळख असणारे उंट, वाळवंट, देऊळ आणि रंगीबेरंगी फेटे, देवाची भूमी अशी ओळख असलेला केरळ, सागरी किना-याचे बेट, मुंबई, बॅकवॉटरमधून जाणारी बोट, हत्ती आणि मुखवटे, तर वाघ आणि एकशिंगी गेंडा आणि चहासाठी जगप्रसिद्ध असलेला आसाम आदींचा यात समावेश आहे.
नामवंतांसह भारताचा जागर
गुगलच्या होमपेजवर महात्मा गांधी, ताजमहाल किंवा अमिताभ यांच्या छबींसह माय इंडिया या विषयावर आधारित छबी राष्ट्रीय दिनी दिसणार आहे. बालदिनी यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रे गुगलवर लावण्यात येतील. गुगलतर्फे होणा-या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ही निवड होते. आम्हीही शाळेतून अशी चित्रे काढून पाठवली आहेत. - अशोक तंटक, कलाशिक्षक, दमाणी विद्यामंदिर
आनंद वाटला
^गुगलने यंदाच्या वर्षी ही चंागली संधी दिली होती. यात माझ्यासह माझ्या मित्रांनी सहभाग नोंदविला आहे. याचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी लागेल पण या मोठ्या व्याप्त गोष्टीत मीदेखील सहभागी झालो याचा मला आनंद आहे. मी माझ्या परीने चांगले चित्र व भारतीय संस्कृती दिसेल असा प्रयत्न केला आहे.'' - केदार कुमठेकर, पोलिस पब्लिक स्कूल