आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश धुडकावून सोलापुरात अधिकारी-कर्मचार्‍यांनी केले आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. तर लिपीकांनी काळ्याफिती लावून काम करत त्यास पाठिंबा दिला. राज्य सरकारने शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. तो डावलून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन झाले.

जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या मुख्य दारातच ध्वनिक्षेपक लावून भाषणे सुरू होती. त्यामुळे आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा नसलेल्यांना बाहेर ताटकळावे लागले. शंभर टक्के प्रतिसादाचा दावा संघटनांना करता आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, कृषी विकास अधिकारी मदन मुकणे, पशसुवंर्धन अधिकारी डॉ. भरत राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे आदी सगभागी झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आंदोलनात अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भाग घेतला. मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गवळी, रमाकांत साळुंखे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शंतनु गायकवाड, बबन जोगदंड, भानुदास शिंदे, सटवाजी होटकर आदी उपस्थित होते.

‘पीडब्ल्यूडी’मध्ये आंदोलन
राज्य सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रo्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दोन तास कामकाजावर बहिष्कार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी दोन तास बहिष्कार आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता अरुण शिंदे, उपकार्यकारी अभियंता अनिल क्षीरसागर, चंद्रशेखर बाळीगेरी, अर्चना आघाव, सुहास कुलकर्णी, प्रभा रोट्टे, शिवराया देशमुख, अरुण गंगावणे, उमाकांत कोठारे, गफूर मुधोळकर, देविदास शिंदे, सुतार, नागा शिंदे, अशोक माळी, राजा साळवे, अशोक इंदापुरे, सुजाता गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

शासनाकडे अहवाल पाठवला
शुक्रवारी केलेल्या आंदोलनात एक हजार 94 कर्मचार्‍यांचा सहभाग होता. त्याविषयीचा अहवाल व कामाजावर झालेला परिणाम याविषयीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याविषयीचा आदेश आल्यानंतर कारवाई करण्यात येईल.
- विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी