आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेघरांच्या आसऱ्यासाठी केंद्राकडून तीन कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील बेघरांना तीन नवीन आसराघर (शेल्टर) बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून दोन कोटी ९१ लाख रुपये अनुदान आलेले आहे. सध्या शहरात तीन आसराघर आहेत. मात्र, देखभाल नसल्याने त्यांची स्थिती दयनीय आहे. आता आणखी तीन आसराघरांची भर पडणार आहे.

शेठ भवानीराम सिकची धर्मशाळा, सिव्हिल हाॅस्पिटलसमोर महापालिकेच्या जागेत आणि मंगळवार बाजार परिसरात महापालिका शाळा क्रमांक चार येथे नाईट शेल्टर केंद्रे आहेत. त्यांची अवस्था दयनीय असताना पुन्हा नव्याने तीन शेल्टर बांधण्यासाठी केंद्राकडून २.४० कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका मोहिमेअंतर्गत राज्यातील ५३ शहरांसाठी ५२ कोटी ११ लाख २४ हजार रुपये दिले आहेत. शहरात तीन नवीन केंद्रे उभारणीसाठी प्रत्येकी ८० लाख याप्रमाणे २.४० लाखांचे अनुदान केंद्राकडून देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश मनपास प्राप्त झाले आहेच. निधीची मागणी करावी, असे त्यात म्हटले आहे.

शहरातील बेघर रस्त्यावर राहू नये, त्यांना निवारा असावा, पाऊस, थंडी आणि उन्हापासून त्यांचे सरंक्षण व्हावे असे यामागचा उद्देश असताना शहरातील तीन शेल्टरमध्ये कोणी राहात नाही. सिव्हिलसमोरील शेल्टर आठ महिन्यांपासून बंद असल्याचे सांगितले.
तीन आसराघरपैकीसिव्हिल हॉस्पिटलसमोरील वगळता अन्य दोन चालू आहेत. तेथे बेघर येत नाहीत. नवीन तीनसाठी केंद्र सरकारचे अनुदान आले असून, जागा निश्चित झाल्यावर त्याचे काम सुरू करणार आहोत.
सारिका आकुलवार, अधीक्षक, भूमी मालमत्ता विभाग, महापालिका

अंमलबजावणी झाल्यास याला पायबंद
रात्रीच्यानिवाऱ्यासाठी असलेल्या आसराघरचा वापर झाल्यास बेघरांचे अपघाती मृत्यू कमी होतील. पाऊस, ऊन, वारा, थंडीपासून ते वाचू शकतील. बाजारपेठेतील दुकानासमोर होणारी घाण थांबेल. मंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी रात्री झोपणाऱ्यांची गर्दी कमी होईल.

शहरात बेघर रस्त्यावरच
शहरातीलप्रमुख मार्गावर बेघर वास्तव्य करत असल्याचे दिसून येतात. त्यांच्यासाठी जागा आहे, याची माहिती सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका एजीओची निवड करणार आहे.
दुरुस्तीसाठी ४५ लाख
तीनशेल्टर दुरुस्तीसाठी प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ४५ लाख अनुदान आले आहे. असलेल्या शेल्टरसाठी तितकी रक्कम लागत नसल्याने अनुदान शिल्लक राहते. ते खर्च करण्यासाठी महापालिकेने तेथे सुविधा देणे आवश्यक आहे.
फोटो - सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असलेल्या बेघर आसराघराची स्थिती अशी आहे.