आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात शासकीय वसतिगृहांमध्ये 1971 जागा, प्रवेशप्रक्रिया सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहरामध्ये समाजकल्याण विभागाचे मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांत मोफत प्रवेश असून येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे येथे प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थ्याची धडपड असते. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभगाचे नेहरू वसतिगृह आणि सावित्रीबाई फुले (शेळगी) अशी दोन वसतिगृहे आहेत. याची एकूण क्षमता 811 इतकी आहे, त्यापैकी मुलांसाठी 736 तर मुलींसाठी 75 जागा उपलब्ध आहेत.
नेहरू वसतिगृहाकडे कल
शहराच्या मध्यवर्ती भागात हे वसतिगृह असल्याने विद्यार्थ्यांचा या वसतिगृहाकडे अधिक कल आहे. नेहरू वसतिगृहाचे गेल्या वर्षी नूतनीकरण झाले आहे. जून महिनाअखेरपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया राहील.

आवश्यक कागदपत्रे
वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्रथम येणार्‍यास प्राधान्य
४वसतिगृहामध्ये प्रवेश देताना प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. बाहेर गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यापद्धतीनेचे वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वसतिगृहांमध्ये जशी क्षमता आहे, त्या पद्धतीने प्रवेश देण्यात येतील.

मनीषा फुले, समाजकल्याण अधिकारी
जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाची शासकीय वसतिगृहे आणि त्यांची प्रवेश क्षमता

वसतिगृहाचे नाव - क्षमता
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(नेहरू नगर) 75
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह(नेहरू नगर) 75
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(पंढरपूर) 65
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(बार्शी) 75
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(करमाळा) 75
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(माढा) 50
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह(अकलूज) 75
वसतिगृहाचे नाव - क्षमता
मागास व आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह(बार्शी ) 75
मागाव व आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह (पंढरपूर) 80
मागास व आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह(अक्कलकोट) 80
मुलांचे शासकीय वसतिगृह (नवी खादी ग्रामोदयोग, सिध्देश्वर मंदिर) 100
मुलींचे शासकीय वसतिगृह (मोहोळ) 60
मुलांचे शसकीय वसतिगृह (बार्शी ) 100
मुलांचे शासकीय वसतिगृह (अक्कलकोट) 100