आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शैक्षणिक वर्ष 2013-14 करिता शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज प्रत्येक वसतिगृहामध्ये उपलब्ध आहेत. जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकूण 15 शासकीय वसतिगृहे असून 1160 जागा उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून चालवले जाणार्‍या शहरातील नेहरू आणि सावित्रीबाई फुले वसतिगृहांत (शेळगी) प्रवेश अर्जाची विक्री चालू आहे. याठिकाणी एकूण 811 जागा असून मुलांसाठी 736 तर मुलींसाठी 75 उपलब्ध आहेत. शहर तसेच जिल्ह्यातून विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी येत आहेत.

सोलापूर शहरात समाज कल्याण विभागाचे मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

नेहरू वसतिगृहाकडे कल
नूतनीकरण झालेल्या नेहरू वसतिगृहाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. आतापर्यंत 500 अर्जांची विक्री झाली. जूनअखेर प्रक्रिया चालू राहील. येथे 184 खोल्या असून प्रत्येक खोलीत चार जणांना प्रवेश आहे. शेळगी येथील सावित्रीबाई फुले या मुलींच्या वसतिगृहात 25 खोल्या असून 75 जणींना प्रवेश देण्यात येतो.

प्रथम येणार्‍यास प्राधान्य
यंदा नेहरू वसतिगृहाची प्रवेशक्षमता वाढली आहे. बहुतांश जणांना येथे प्रवेश मिळणार आहे. पूर्वी 552 जणांनाच प्रवेश् मिळत होता. यंदा एका खोलीत चार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे 184 जागा नवीन निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक मुलांकडून वर्षभरासाठी 1150 रुपये शुल्क आहे. प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.’’ बाबा शेख, अधीक्षक, नेहरू वसतिगृह

गुणवत्तेनुसार प्रवेश
समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जास्त प्रमाणात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे शहरांमधील वसतिगृहांना जास्त मागणी आहे.’’ दीपक घाटे, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद