आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या आस्थेचाही ‘दुष्काळ’, अवर्षण हेलिकॉप्टरमधून पाहिले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- ज्यांच्या दौ-यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गेल्या आठ दिवसांपासून कामात गुंतली होती. ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार म्हणून जिल्हा प्रशासनाने शेतापर्यंत गाड्यांचा ताफा नेण्याचीही सोय केली होती. संवाद साधण्यासाठी शेतक-यांची निवडही केली, पण ते आले मात्र, बांधाजवळच थांबले. ते मोजक्याच शेतकऱ्यांच्या जवळ गेले. अवघी पाच मिनिटे संवाद साधून निघून गेले. मात्र, ते काय बोलले, हेच शेतक-यांना कळले नाही. शासनाकडून थट्टाच सुरू असल्याने शेतकऱ्यांचीही पुरती निराशा झाली. सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या दौऱ्याचे हे फलित आहे.
तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या युवक महोत्सवाचा समारोप करण्यासाठी राज्यपाल येणार असल्याचे आठ दिवसांपूर्वी निश्चित झाले होते. त्यानंतर राज्यपालांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने वारंवार बैठका घेऊन तयारीत कसर राहणार नाही, याची दक्षता घेतली होती. त्यानंतर राज्यपालांचा दौरा केवळ ‘टाटा’साठी मर्यादित राहता शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी निश्चित झाला. या सुधारित दौऱ्यानुसार राज्यपाल उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव(सि.) येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता मंुबईहून हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर त्यांना हेली पॅडपासून २०० मीटर अंतरावरील एका शेतात पिकाची कशी वाताहत होत आहे, हे दाखविण्यासाठी नेण्यात आले. नियोजित दौऱ्यानुसार ते रस्त्यालगत असलेल्या बालाजी मोरे यांच्या शेतात गेले. बांधाच्या जवळच ज्वारीच्या पिकाची पाहणी करून त्यांनी शेतकरी बालाजी मोरे, नितीन मोरे यांच्याशी संवाद साधला. हा कार्यक्रम अवघ्या दोन ते पाच मिनिटांत संपला. ते शेतकऱ्यांना काय बोलले, कळलेच नाही.हा दौरा आटोपता घेऊन त्यांनी वडगावातील जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमास हजेरी लावली.
दौऱ्यात वेळा हेलिकॉप्टरचा वापर
राज्यपालांनीसकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे तास केलेल्या दौऱ्यात तीन वेळा हेलिकॉप्टरचा उपयोग केला. वडगाव येथे कार्यक्रम आटोपून ते यमगरवाडीला हेलिकॉप्टरने गेले.
काय म्हणाले राज्यपाल?
वडगावच्याजिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात ते म्हणाले, ‘निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वांनी मिळून मात करावी. शेतकऱ्यांनी या संकटाचा धैर्याने मुकाबला करावा आणि आत्महत्या करू नये.’
सातबारा झाला कोरा
महसूलविभागाच्या समाधान योजनेअंतर्गत वडगावात रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे, शेतकरी गटाचे प्रमाणपत्रासह लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून देण्यात आला. सातबाऱ्यावर बोजा टाकण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते.
आता पेनल्टी सिस्टिम
वाहतुकीच्यानियमांचे उल्लंघन केल्यास पेनल्टी सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या नियमांनुसार पेनल्टीचे गुण ठरवण्यात आले आहेत. पेनल्टीचे १२ गुण झाल्यास चालकाचा परवाना निलंबित होईल. त्यानंतर पुन्हा १२ गुणांची पेनल्टी मिळाल्यास परवाना पाच वर्षांसाठी रद्द करण्यात येईल, तर शिकाऊ वाहनचालकास चार गुणांची पेनल्टी मिळाल्यास त्यांचा परवाना रद्द होणार आहे.