आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graduate Constituency,Latest News In Divya Marathi

पदवीधर मतदार संघातही मोदी लाटेची उत्सुकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभा निवडणुकीत देशभरात आलेल्या मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते उत्सुक आहेत. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर अनेकांचा डोळा असून इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून एकूण 9 तर शिक्षक मतदार संघातून तब्बल 22 जण इच्छुक आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह 9 जण पदवीधर निवडणुकीत सामोरे जात आहेत. पाटील हे पूर्वार्शमीचे अभाविपचे कार्यकर्ते आहेत. या मतदार संघातून आतापर्यंत भाजपचे उमेदवार तीन वेळा निवडून आले आहेत. या खेपेस पश्चिम महाराष्ट्रात मोदी फिव्हरही आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांचे पारडे इतरांपेक्षा जड असल्याचे दिसून येते.
सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदार संघात मागील निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील यांची लढत कॉंग्रेसप्रणित माणिक पाटील-चुयेकर व राष्ट्रवादीचे राजेश पाटील-वाठारकर यांच्याशी झाली होती. त्यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीला पराभूत करून आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले होते.
आठवा उमेदवार कोण ?

आतापर्यंत मतदार संघातून समाजवादी विचाराचे ग. प्र. प्रधान, प्रकाश जावडेकर, चदं्रकांत पाटील, जनता दलाचे शरद पाटील आमदार म्हणून निवडून आले आहेत. सोलापूरला मात्र आतार्पंत एकदाही संधी मिळाली नाही. नोंदणी झालेल्या 5 लाख 93 हजार 707 मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे असा प्रश्न उमेदवारांसमोर आहे.
या उमेदवारांत लढत

आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा आपली उमदेवारी जाहीर केली. मागील निवडणुकीत अल्पमताने पराभूत झालेले राजेश पाटील वाठारकर यांच्यासह अरुण लाड, सारंग पाटील, शरद बुट्टे पाटील यांनीही उमदेवारीची मागणी केली आहे. शरद पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्मथक आहेत तर अरुण लाड हे जी. डी. बापू लाड यांचे तसेच सारंग पाटील हे सिक्कीमचे राज्यपाल र्शीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत. यापैकी लाड यांना मागील निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारले होते. याशिवाय विधानपरिषदेचे सभापती शिवाजी देशमुख यांचे प्रा. सम्राट शिंदे हे कॉंग्रेसकडून, मनसेकडून अनिल शिदोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.