आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graduate' Constituency,Latest News In Divya Marathi

‘पदवीधर’चे 17, ‘शिक्षक’चे 19 उमेदवार आहेत रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये पदवीधरसाठी 17 व शिक्षक मतदारसंघासाठी 19 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
शिक्षक मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे डॉ. मोहन राजमाने व लोकभारतीचे शिवाजी खंडेराव तर सोलापुरातील शाळा कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सावंत आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने यांच्यात लढत होणार आहे. पदधवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार चंद्रकात पाटील, जनता दलाचे शरद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सारंग पाटील आणि राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड आणि शैला गोडसे यांच्यात सामना रंगणार आहे.
निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. शिक्षक मतदारसंघातून दोन व पदवीधर मतदारसंघातून सात उमेदवारांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. शिक्षक मतदारसंघात एकूण 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पदवीधर मतदारसंघात 24 जणांनी अर्ज दाखल केले होते. शिक्षक मतदारसंघातून राजाराम पाटील व उमेश देशमुख या अपक्षांनी आणि पदवीधर मतदारसंघातून सचिन पटवर्धन , रेखा आहिरराव, सम्राट शिंदे, पराग चांदगुडे, दिलीप शिंदे, उमेश खेड्डेझाडे आणि राष्ट्रवादी बंडखोर उमदेवार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी अर्जमागे घेतले आहेत.

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या अविनाश ताकवाले यांनी बंडखोरी करत महाराष्ट्र राज्य राष्टवादी शिक्षक सेलच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.