आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कडधान्याचे उत्पादन घटणार; पेरणी लांबली; मका, ज्वारी घेण्याचा तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अल निनोमुळे यंदाही पावसाळा लांबण्याचे संकेत आहेत. 27 जून उजाडूनही मोसमी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. खरिपाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. आतापर्यंत फक्त एक टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या हंगामात खरिपाचे क्षेत्रही घटणार असल्याची लक्षणे आहेत.

जिल्ह्यात 91 हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. जूनच्या दमदार पावसाची शक्यता गृहित धरून कृषी विभागाने नियोजन केले. जूनमध्ये सरासरी 102 टक्के पाऊस पडतो. पण, 27 तारखेपर्यंत जिल्ह्यात फक्त 38 टक्केच पाऊस झाल्याने फक्त एक टक्के पेरणी झाली. गेल्यावर्षी जूनच्या दुसर्‍या व तिसर्‍या आठवड्यात 12 टक्के पर्यंत पेरण्या उरकल्या होत्या. यंदा मात्र मशागतच झालेली नाही. वार्‍यासह धावणार्‍या ढगांनी शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. जूनचा पाऊस जुलैमध्ये पडत असल्याने पावसाळ्याचे दिवस कमी झाले आहेत.
बियाणे खरेदी ठप्पच
शेतकरी खते-बियाणांसाठी फिरकत नसल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. काही तालुक्यांमध्ये खरीपच मुख्य हंगाम असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होईल, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे.
बदलत्या हवामानात कडधान्य शक्य नाही
खरीप पेरणीचा हंगाम संपल्याने 21 जूननंतर पेरण्या झाल्या तरी अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता मावळली आहे. कडधान्याचे पीक तर बदलत्या वातावरणात घेणे अशक्य होईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरिपाची ज्वारी व मक्यासारख्या पिकांना प्राधान्य द्यावे. त्याचा चारा व धान्य दोन्हीसाठी उपयोग होईल. हंगाम संपला तरी ही दोन्ही पिके काही प्रमाणात पर्याय ठरतील.’’
रफीक नाईकवाडी, कृषी अधीक्षक, सोलापूर

...तर शेतकरी देशोधडीस लागेल

४गतवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बर्‍यापैकी पाऊस पडल्याने पेरण्या उरकल्या होत्या. रब्बीत मात्र पावसाने दगा दिला. शेवटच्या टप्प्यात अवकाळी व गारपिटीने तोंडचा घास हिरावला. यंदा पावसाने पाठ दाखवल्याने खरिपाची चिंता भेडसावत आहे.’’
दिनेश नवले, शेतकरी, मंद्रूप
21 जूनपर्यंत पेरण्या नसल्याचा फटका
कडधान्याची पेरणी 21 जूनपर्यंत आवश्यक आहे. ती झालेली नाही. त्यामुळे यंदा त्याच्या उत्पादनात घट होणार आहे. कडधान्याच्या उत्पादनासाठी बार्शी, माढा, मोहोळ तालुके अग्रेसर असतात.