आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदूताई परूळेकर वसाहतीमधील मतदारांना करता येणार नाही मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील 659 ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासमोर प्रभाग रचना आरक्षणबाबत प्राप्त ५०५ अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यापैकी १६३ हरकती मान्य करण्यात आल्या तर ३४२ हरकती फेटाळण्यात आल्या. मान्य केलेल्या हरकतीमध्ये आरक्षणासंबंधीच्या ५० तर प्रभाग रचनेच्या ११३ हरकतीचा समावेश आहे.
जून ते डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ६६१ ग्रामपंचायतीची एप्रिल ते मे या कालाधीत निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ५५९ ग्रामपंचायतीची प्रभाग रचना आरक्षण करण्यात आले होते. त्यापैकी जिल्हाधिकारी मुंढे यांच्याकडे ५०५ हरकती प्राप्त झाल्या होत्या. यापैकी ३४२ हरकती अमान्य करण्यात आल्या. यात प्रभाग आरक्षणाच्या ८१ तर प्रभाग रचनेच्या २६१ हरकतीचा समावेश आहे.
कुंभारी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल
कुंभारीयेथील आप्पासाहेब बिराजदार, शिरीष पाटील शिवानंद अंदोडगी यांनी गोदूताई परूळेकर िवडी कामगार वसाहतीचा कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये समावेशाला हरकत घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी मुंढे यांनी शासनाच्या २०१० च्या निर्णयाचा आधार घेत कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये परूळेकर वसाहतीचा समावेश राहणार नाही. या वसाहतीला शासनाने स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा दिला आहे. यामुळे कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये वसाहतीचा समावेश राहणार नसल्याचे स्पष्ट केले.