आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभेचे दारूकाम: अखंड भारताचा संदेश, गड्डा यात्रा, नागरिकांनी अनुभवला नयनरम्य सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत शुक्रवारी होम मैदानावर शोभेच्या दारूकामाचा नयनरम्य सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यातून अखंड भारत आणि किसान बचावचा संदेश देण्यात आला. शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच होम मैदानावर दारूकाम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री साडेआठ वाजता मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद््घाटन झाले. त्यानंतर सुमारे पाऊणतास आकाशात रंगीबेरंगी आतषबाजी पाहायला मिळाली. आकाशात उडत असलेली आकर्षक रोषणाई टिपण्यासाठी तरुणाईचे मोबाइल पुढे झेपावत होते. शिवाय पालकांनी आपल्या चिमुकल्यांना खांद्यावर घेत कुटुंबासह शोभेच्या दारूकामाचा आनंद लुटला. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज विधी सांगता
यात्रेचीसांगता शनिवारी कप्पडकळी या विधीने होणार आहे. मानकऱ्यांनी परिधान केलेल्या भगव्या वस्त्रांचे विसर्जन म्हणजे कप्पडकळी. देशमुखांकडून आहेर स्वीकारून नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिरात येऊन पाच प्रदक्षिणा घालतात.
प्रमुख आकर्षण
मुलूखमैदान तोफ, त्रिशूल, कलर झाड, स्काय बॉल, उगवता सूर्य, म्हैसूर कारंजा, धबधबा क्रकलिंग, भारताचा नकाशा, श्री सिद्धेश्वर प्रतिमेस हार अर्पण, किसान बचाव देश बचाव, व्हील म्युझिक पार्टी, सोनेरी अनार आकर्षक ठरले.
एम.ए. पटेल प्रथम
शोभेच्यादारूकाम स्पर्धेत एम. ए. पटेल यांनी विजेतेपद पटकाविले. द्वितीय - शिकलगार फायर वर्क्स, तृतीय -बाबालाल फटाका मार्ट, विटा या विजेत्यांसह आदित्य फायर वर्क्स, जय महाराष्ट्र फायर वर्क्स यांनी सहभाग नोंदवला.