आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graps Distalary Case : Municpal Corporation Commissioner Gundewar Decision Good Said Kothe

ग्रेप्स डिस्टलरी जप्तीचे प्रकरण : मनपा आयुक्त गुडेवारांच्या कारवाईचे कोठेंनी केले सर्मथन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विष्णू-लक्ष्मी ग्रेप्स को-ऑपरेटिव्ह डिस्टलरी लिमिटेडवर पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केलेल्या कारवाईचे सभागृह नेते महेश कोठे यांनी सर्मथन केले. एलबीटी वसुलीचे हे दबावतंत्र असून, त्याचे मी स्वागतच करतो. परंतु विष्णू-लक्ष्मी संस्थेची थकबाकी 95 लाखांची नाही. 17 ते 18 लाखांची रक्कम देय असेल,असेही ते म्हणाले.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी श्री. कोठे स्वत: संचालक असलेल्या विष्णू-लक्ष्मी संस्थेची मालमत्ता महापालिकेने तात्पुरती जप्त केली. वर्षानुवर्षे पालिकेवर अधिराज्य गाजवणार्‍या कोठे यांच्या संस्थेवरच कारवाई झाल्याने सोलापूरकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोठेंनी मात्र या कारवाईचे सर्मथन केले. संस्थेची बाजू मांडून देय असलेली रक्कम भरणार असल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे एलबीटी वसुली होणारच, असा गर्भित इशारा गुडेवारांनी दिला.


पालिकेत मांडली भूमिका
थकबाकी असल्याने मिळकत तात्पुरती जप्त केली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कोठे मंगळवारी कार्यस्थळी गेले. त्यानंतर सायंकाळी महापालिकेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मोठय़ा रकमांची थकबाकी वसूल करण्यासाठी वापरलेले हे दबावतंत्र आहे. बुधवारी आम्हाला सुनावणीसाठी बोलवले. त्यावेळी हजर राहून बाजू मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


आज होणार सुनावणी
‘व्हॅट’च्या आकडेवारीनुसार एलबीटीची थकबाकी काढली. पण उत्पादनांच्या विक्रीवर एलबीटी असते. येथील उत्पादित माल शहरात विकला जात नाही. विकला तरी त्यांची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होते. त्यावर तीन टक्यापेक्षा जास्त एलबीटी नाही. हेच गुडेवार यांच्यासमोर स्पष्ट करू.’’ महेश कोठे, सभागृह नेते