आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल भरण्यासाठी आता ग्रास प्रणाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शासनाला विशेषत: महसूल विभागाला जमा करण्यात येणाऱ्या विविध रकमा आता शासकीय जमा लेखांकन प्रणाली अर्थात ग्रास प्रणालीद्वारे भरावी लागणार आहे. अर्थातच ही प्रणाली सुरू करण्यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी, निवासी नायब तहसीलदार यांना ३१ जुलैपूर्वीच प्रणाली वापराबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रास प्रणालीमुळे चलनाद्वारे रक्कम भरणे इतिहासजमा होणार आहे.
विविध कार्यालयांकडून जमा होणाऱ्या महसूल रकमांचा ताळमेळ ठेवण्याची जबाबदारी जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तर तालुकास्तरावर निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे असणार आहे. यासाठी प्रत्येक अधिकारी यांना स्वतंत्र लॉगिन (login) देण्यात येणार आहे.
भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमा रकमेचा होईल ताळमेळ
जिल्हानिहाय कार्यालयांमध्ये ग्रास प्रणालीद्वारे जमा होणाऱ्या रकमांचा ताळमेळ दिलेल्या पद्धतीनुसार मुदतीत घेण्यात येतो किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी भूमी अभिलेख कार्यालयाकडे देण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, तालुकास्तरावर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यासाठीही स्वतंत्र लॉगिन (login) देण्यात आला आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी जिल्हास्तरावर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपीक, तालुकास्तर कार्यालयातील मुख्यालय सहायक यांच्याकडे देण्यात येणार आहे.
शाखेनिहाय महसूल जमा करण्याची जबाबदारी
जिल्हाप्रशासनाकडून महसूल जमा करण्याची जबाबदारी तहसीलदार महसूल, करमणूक कर जमा करण्याची जबाबदारी करमणूक कर अधिकारी गौण खनिज उत्खननातून कर जमा करण्याची जबाबदारी जिल्हा खनिकर्म अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला तहसीलदार दर्जाचा अधिकारी तर तालुकास्तरावर नायब तहसीलदार महसूल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...