आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर: चाळीसव्या दशकापासून 1975 पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीवर ‘राज’ करणार्या ग्रेट शो मॅन राज कपूर यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी एक वल्ली सोलापुरात आहे. आरकेंचा दिवानाच आहे तो. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे जमवली. कोणत्याही दैनिकांत आपल्या लाडक्या राजसाहेबांबद्दल काही छापून आले तर हा बहाद्दर ते दैनिक विकत घेऊन कात्रण काढून आपल्या संग्रहात व्यवस्थित जपून ठेवतो. याचे राजप्रेम पाहून 1986 मध्ये डॉ. अनिल गुंजोटीकर यांनी स्वखर्चाने राज कपूरच्या भेटीस नेले. खुद्द राज कपूर यांनी चाहत्याने केलेला आपल्या चित्रांचा संग्रह पाहिला आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत कौतुक केले. या अवलिया चाहत्याचे नाव आहे अब्दुल मजिद सुगूर.
ब्रदर आणि आरके
सुगूर हे आपला चरितार्थ चालवण्यासाठी शहरातील नामंवत हॉस्पिटल्समध्ये ब्रदर आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणून काम करतात. डॉ. अनिल गुंजोटीकर, डॉ. भालचंद्र किणीकर, डॉ. वासंती मुनोत, डॉ. नारायणदास चंडक, डॉ. श्याम तोष्णीवाल, डॉ. विलास सलगरकर, डॉ. उदय वैद्य यांचे त्यांना सदैव सहकार्य लाभत आले आहे. ‘ब्रदर’ आणि ‘आरके’ या नावानेच त्यांना ओळखले जाते.
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आरके फॅन असोसिएशनही
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>राज कपूर यांच्या निधनानंतर अ. मजिद यांनी महाराष्ट्र प्रदेश आर. के. फॅन्स् असोसिएशनची स्थापना केली. संस्थेचे महाराष्ट्रात हजारहून अधिक चाहते सभासद आहेत. प्रतिवर्षी राज कपूर यांची जयंती व पुण्यतिथी संस्थेतर्फे मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येते. आरके यांच्या सर्व चाहत्यांना एकत्र करून त्यांच्याजवळील संग्रहांचे एकत्रित प्रदर्शन भरवण्याचा सुगूर यांनी संकल्प केला आहे. हे प्रदर्शन आरकेप्रेमींसाठी एक पर्वणीच असेल.
अडीच लाख रुपये देऊन गौरव
राजकपूर यांच्या निधनानंतर 18 जानेवारी 1992 रोजी राजकपूर इंटरनॅशनल या संस्थेमार्फत रणधीर कपूर यांनी राजकपूर यांचा चित्रसंग्रह केलेल्यांच्या संग्रहांचे मुंबईतल्या मेट्रो टॉकीजमध्ये प्रदर्शन भरवले होते. त्यात सुगूर यांनी केलेला ‘आग’ ते ‘राम तेरी गंगा मैली’ या सर्व चित्रपटांचा दुर्मीळ चित्रसंग्रह पाहून त्यांना 2 लाख 51 हजार रुपयांचा ‘राज कपूर’ अँवार्ड हा प्रथम पुरस्कार मिळाला. रणधीर कपूर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
‘सबकुछ आरके के लिये’
अब्दुल मजिद यांचे व्यक्तिमत्त्व राजप्रेमाने इतके भारले आहे की त्यांनी स्वत:च्या तीनही मुलांची नावे राजअमर, रूबिया, रेश्मा अशी ‘आर’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारी ठेवली. मोठय़ा भावाच्या मुलाचे नाव रिजवान तर लहान भावाच्या मुलांची नावेही रियाज अहमद व रिजवाना अशी ठेवली आहेत.ऊ्र58ं>ऊ्र58ं>
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.