आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्स चार्ल्‍सकडून सोलापूरच्या तरुणाचे आभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- इंग्लंड राजघराण्याचा डामडौल जगप्रसिद्ध आहे, तसाच सामान्यांची दखल घेण्याचा मोठेपणाही मनाला भावणारा आहे. याचा अनुभव नुकताच सोलापूरच्या एका शिक्षकाला आला. त्याचे झाले असे की प्रिन्स चार्ल्‍स विल्यम्स यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर सोलापुरातील हस्ताक्षर शिक्षक अभिजित भडंगे यांनी अभिनंदन पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत प्रिन्स चार्ल्‍स यांनी भडंगे यांच्या पत्राला उत्तर देत रॉयल मेल पाठवून आभार व्यक्त केले.

भडंगे यांनी प्रिन्स चार्ल्‍स यांना पाठवलेले पत्र इंग्लिश कर्सिव्ह लेटर प्रकारातील होते. त्याचे वजन साधारण 15 ग्रॅम असेल. ते पाठवण्याआधी पाकीट फोडून ते मुख्य टपाल कार्यालयात वाचण्यात आले. त्यात आवश्यक असणारे शब्दप्रयोग पाहून ते पुढे पोस्ट झाले. साध्या पोस्टला 25 रुपये तर स्पीड पोस्टला 1 हजार 73 रुपये खर्च येतो. हे पत्र साध्या पोस्टने पाठवण्यात आले.

राजघराण्‍याचे सौजन्‍य... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..