आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Green Building Awareness Of Activities In Solapur

ग्रीन बिल्डिंगच्या जनजागृतीने पर्यावरणाचा -हास होणार कमी, पालकमंत्री, महापौरांची प्रमुख उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खेळता सूर्यप्रकाश, पाण्याचे, ऊर्जेचे संवर्धन, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर आदी अनेक निकषांवर ग्रीन बिल्डिंगचा दर्जा ठरतो. त्यानुसार यंदाच्या स्थापत्यने ग्रीन बिल्डिंग बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल.
ग्रीनबिल्डिंगचे फायदे
घरातवापरात असलेल्या नळातून पाणी वाया जाते. त्यामुळे पाहिजे तेवढे पाणी आणि स्पर्श करताच पाणी बंद होत असलेले नळ, बाथरुममध्येही वापरात असलेल्या पाण्यावर नियंत्रण, सिमंेटमध्ये ३० टक्के राखेचे मिश्रण असल्यास त्या सिमेंटला मजबुती येते असे सिमेंट. विजेच्या बाबतीत प्रकाश तेवढाच देणारे मात्र विजेची बचत करणारे साहित्य, विटांसाठी लागणारी माती खर्च होऊ नये म्हणून खडी, वाळू, राख आदी मिश्रण करून तयार करण्यात आलेल्या विटा, विजेची आणि इंधनाची बचत होईल असे सोलार पंप, हिटर, गिझर आदी साहित्य.पाण्याचे आणि ड्रेनेजचेही पीयूसी पाइप तसेच खिडक्या, दरवाजे, वॉश बेसीन आदी पीयूसीचे. प्लास्टिकचा पुनर्वापर, पाण्याचा पुनर्वापर आदी साहित्य यंदाच्या "स्थापत्य'मध्ये ठेवण्यात आले अाहेत.
थाटात उद्घाटन
दरवर्षीप्रमाणेयंदाही होम मैदान येथे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स, सोलापूरच्या वतीने आयोजित केलेल्या स्थापत्यचे उद््घाटन शुक्रवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. या वेळी खासदार शरद बनसोडे, महापौर सुशीला आबुटे, यासीन मोतीवाला,अध्यक्ष प्रकाश तोरवी, इफ्तेकार नदाफ, अमोल मेहता, विनायक जोशी, मनोज म्हेत्रज, श्याम पाटील, सलीम नाईकवाडी, प्रवीण हेडगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रारंभी प्रमुख पाहुण्यांनी स्टॉल भेट दिली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, "बांधकामामुळे शहराचे सौंदर्य खुलते. बांधकाम क्षेत्रामध्ये सोलापूर म्हणजे स्वस्त आणि मस्त झाले आहे. आज जसा जुळे सोलापूरचा विकास झाला आहे तसा शेळगी परिसराचाही होणे आवश्यक आहे. सोलापूरला पाच महामार्ग जुळतात. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात सोलापूरचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल,' असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले. "स्थापत्य'चे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार शरद बनसोडे, महापौर सुशीला आबुटे आदी.