आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्यापेक्षा सोन्यासारखी मुलगी हवी आम्हाला!, दागिन्यांची चोरी, लग्न ठरल्यावेळीच होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "जोडीदार चांगली मिळाली की आयुष्याचे नंदनवन होते. ऐन लग्नाआधी झालेली चोरीची घटना वाईटच. पण सोन्यासाठी लग्न थांबवणाऱ्यांतले आम्ही नाही. सोन्यापेक्षा सोन्यासारखी मुलगी महत्त्वाची...' अशी प्रतिक्रिया नवरदेवाने दिली आणि वधूपिता अरुण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

लग्न म्हटले की मानपान, हुंडा, सोने आले. पण बागलकोट येथील नवरदेव राजीव कलादगी व त्यांचे कुटुंबीय यास अपवाद ठरले. यशवंतनगरचे अरुण जाधव यांची इंजिनिअर कन्या अश्विनीचा विवाह बुधवारी आहे. शनिवारी रात्री जाधव कुटुंबीय गच्चीवर झोपले. घराच्या मागील खोलीत पाच नातलग महिला झोपल्या होत्या. गेट चढून आलेले चोर किचनचे दार तोडून घरात घुसले. कूलरच्या आवाजात महिलांना कळले नाही. कपाटातून १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या. पहाटे ४ वाजता प्रकार लक्षात येताच जाधव कुटुंबीय चिंतेत पडले. पण नवरदेवाकडच्या मंडळींनी मात्र त्यांना धीर दिला.
नवरदेव बँक मॅनेजर
नवरदेव राजीव कॅनरा बॅँकेत व्यवस्थापक आहे. वधूपिता अरुण जाधव यांचा मोहोळला रेडीमेडचा व्यवसाय आहे. मुलगा रोहन पुण्यात एमबीए करतोय, तर मुलगी अश्विनी बी. ई. आहे.
बातम्या आणखी आहेत...