सोलापूर- जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी शनिवारी शहर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात वादळी वारा व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शहर व ग्रामीण भागात झालेल्या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकर्यांशी संवाद साधत नुकसान व अडचणींची माहिती घेतली. नुकसान झालेल्या नागरिकांच्या मालमत्तेचे पंचनामे करून शासनाकडे तत्काळ अहवाल पाठवण्याची सूचना केली.
शनिवारी सकाळी पालकमंत्री सोपल यांनी शहरातील साईनाथ नगर, शांती नगर, नीलम नगर, नई जिंदगी परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या नुकसानीची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. वादळी वार्याने संपूर्ण घरच पडलेल्या शांतीनाथ नगर येथील अनुसया बिराजदार (वय 40) या महिलेशी संवाद साधला. घराची पाहणी करून शासनाकडून मदत देण्याची सूचना उपस्थित अधिकार्यांना केली.
कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यामुळे मृत मयूर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन क्षीरसागर कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले, तसेच ज्या झाडाची फांदी पडून मुलाचा मृत्यू झाला त्या ठिकाणाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. कुंभारी येथीलच गंगाधार गंदूरकर यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी करून संवाद साधला. उपस्थित अधिकार्यांना पंचनामा केला आहे का, याचीही विचारपूस करून तत्काळ अहवाल देण्यास सांगितले. यानंतर अक्कलकोट तालुक्यातील कोळीबेट, काळेगाव, सांगवी या ठिकाणी फळपिके, घरांच्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. बूथ यंत्रणेबाबत चर्चा
सोलापूर लोकसभेची जागा वाट्याला आल्याने भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. गुरुवारी प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी सोलापुरात आले होते. बूथ यंत्रणेबाबत माहिती घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी पक्ष कार्यालयात घेतली.