आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसतं गोड बोलून काम संपत नाही, पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना खडसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका प्रवेशद्वार समोर मारुती झांबरे याने एन. ए. आॅर्डर मिळावी यासाठी उपोषण सुरू केले. तेथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आले असता मनपाचे अधिकारी आले नाही. अप्पर आयुक्तांसह अन्य अधिकारी आले. देशमुख म्हणाले, लोक येथे जीव देत आहेत, गोड बोलून काम संपत नाही, त्यांना निर्धारित वेळ द्या.

उपोषणस्थळी पालकमंत्री आले होते. फोन करूनही मनपा अधिकारी वेळेवर आले नाहीत. नगरसेवक नरेंद्र काळे, शिवानंद पाटील यांनी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना फोन लावला. आयुक्त कार्यक्रमात असल्याने फोन घेतला नाही. त्यानंतर अप्पर आयुक्त विलास ढगे, उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहाय्यक आयुक्त अमिता दगडे, नगर रचना अधिकारी महेश क्षीरसागर आदी आले. लोक येथे जीव देत आहेत, गोड बोलून काम संपत नाही. प्रश्न निकाली काढला पाहिजे, असे देशमुख म्हणाले. आयुक्त नसल्याने ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे देशमुख तेथून निघून गेले.
बातम्या आणखी आहेत...