आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमआयटीमध्ये 'विचार मंथन' डॉ. श्रीवास्तव, गायक अवधूत गुप्ते, मधुरा वेलणकर यांचे मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जागतिक तापमानवाढीवर चिंतन व्यक्त करत असतानाच उंच ध्येय बाळगा, वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रेरणादायक संदेश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळाला . निमित्त होते बीएमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विचारमंथन २०१५ चे.
सहकार तपस्वी (कै.) बह्मदेवदादा माने यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त बेलाटी येथील बीएमआयटी अभियांत्रिकी महािवद्यालयाच्या प्रांगणात विचारमंथन २०१५ उपक्रम घेण्यात आला. यात डॉ. प्रदीपकुमार श्रीवास्तव, राधिका वेलणकर आणि अवधुत गुप्ते यांनी विविधांगी प्रेरक व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने, जयश्री माने, सचिवा स्नेहल माने, बीएमआयटीचे प्राचार्य डॉ. एम.एस. पवार, बीएमपीचे प्राचार्य प्रा. एस. बी. जोशी, एसपीएमचे प्राचार्य प्रा. आर. वाय. माने, उद्योजक केतन शहा, भारत जाधव यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. गणेश वंदनेवरील नृत्याविष्काराने, राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अभय गौर , तृप्ती पुराणिक प्रा. विवेक वारे यांनी केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनात काही बनायचे असेल, तर वेगळेपण सिद्ध करा : गुप्ते
जीवनातकाहीतरी बनायचे असेल तर त्या दृष्टीने पावले टाकताना सेम टू सेम कॉपी करू नका, कारण त्यातून यश मिळणार नाही, त्यापेक्षा वेगळेच काहीतरी करा, यश निश्चित मिळते, असे मत प्रसिद्ध संगीतकार, गीतकार अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केले. नव्या कल्पनेवर काम करताना तुम्हाला नक्कीच १०० टक्के विरोध होणार. तरीही अनुभव घेत राहिलात, स्वत:ला सिद्ध करू शकलात तर यश मिळते. अपशय पदरात पडत असताना आपला आत्मविश्वास कदापि गमावू नका. काहीतरी नवीन करत असताना नेहमी विरोध होत असतो. त्याला जुमानता कामात झोकून देण्यास त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ऐका दाजिबा, मोरया मोरया, जय जय महाराष्ट्र माझा, .. आदी गीत सादर करून तरुणाईची मने जिंकली.
जागतिक तापमानवाढ चिंतेची बाब : श्रीवास्तव
जगभरातीलएकूण प्रजातीपैकी तब्बल दोन तृतीयांंश बेडकांच्या प्रजाती लुप्त झाल्या, याचे एकमेव कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ. गेल्या ५० वर्षात केवळ दोन डिग्रीने तापमान वाढ झाल्यानंतर हा िनष्कर्ष नोंदला गेला. त्यामुळे ग्लोबल वार्मिक हा जगभरातील चिंतेची बाब बनली आहे, केवळ निसर्गाला वाचवले तरच निसर्ग आपणास वाचवू शकतो, असे मत सेंट्रल ड्रग रिसर्च इनिस्ट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, सायंटुनिक्सचे जनक डॉ. प्रदीपकुमार श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.कार्बन मोनाक्साईडचे वाढते प्रमाण, अपरिमित जंगलतोड, बेसुमार पाणी उपसा, वृक्षलागवडीचा मंदावलेला वेग, इंधन मिळविण्यासाठी होणारे निसर्गनियमाविरूद्धचे वर्तन याचा एकत्रित परिणाम पाहता निसर्ग रूसणार आहे, याचा फटका मानवाला बसेल, असेही डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटलेे आहे.

अपयशाने घाबरु नका, झेप उंच घ्या, ध्येय साकारा : वेलणकर
अपयशपचवायची ताकद असेल तर यश निश्चित प्राप्त होते. आपल्या कर्तृत्वाची झेप उंच न्यायची असेल तर अनुभव सज्ज व्हा. मनाने खंबीर राहा. जे करू ते सच्चे, प्रामाणिकपणे हे पक्के ठरवा. केवळ ग्लॅमरच्या मोहात अडकू नका, असे मत सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी व्यक्त केले. आयुष्यात घेतलेले कोणतेही शिक्षण कधी वाया जात नाही. मी लहानपणी विविध खेळात सहभाग घेत असे, सरीवर सरी चित्रपट चित्रकरणावेळी उंच टांगलेली दहीहंडी चक्क डोक्याने फोडण्याचे धाडस केले, त्या दोरखंडाला लटकून नृत्याच्या स्टेप्स दिल्या, आणि तेथून खाली उडीही मारली. हा बॅलन्स, हा अात्मविश्वास या लहानपणाच्या खेळातूनच मिळालेला होता. तोच उपयोगी आला. अनुभव सज्ज व्हा, हेच अभिप्रेत आहे.